Join us

‘ Indian Idol 13’ ट्रोलर्सच्या निशाण्यावर; प्रोमो पाहून भडकले युजर्स, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 15:44 IST

Indian Idol 13 trolled : काही दिवसांपूर्वीच  ‘इंडियन आयडल 13’ चा प्रोमो रिलीज झाला. काही चाहते हा प्रोमो पाहून सुखावले. पण काहींनी मात्र या शोला जबरदस्त ट्रोल करायला सुरूवात केली.

‘इंडियन आयडल’चा 13 वा सीझन ( Indian Idol 13 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. टीव्हीच्या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोपैकी एक असलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांना आपलं टॅलेंट जगाला दाखवण्याची संधी मिळते. काही दिवसांपूर्वीच  ‘इंडियन आयडल 13’ चा प्रोमो रिलीज झाला. काही चाहते हा प्रोमो पाहून सुखावले. पण काहींनी मात्र या शोला जबरदस्त ट्रोल करायला सुरूवात केली आहे.  ‘इंडियन आयडल 13’वर अनेकांनी आपली भडास काढली आहे. अनेकांनी हा शो फेक, स्क्रिप्टेड असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी या शोमधून नेहा कक्करला हटवण्याची मागणी केली आहे.

‘सोनी टीव्हीचा स्क्रिप्टेड रिअ‍ॅलिटी शो पुन्हा एकदा येतोय,’असं एका युजरने लिहिलं आहे. हा खरंच रिअ‍ॅलिटी शो आहे? मी ऐकलं की कुण्या एका विनरच्या बहिणीला शोमध्ये आणणार आहेत, जेणे करून ती संगीत शिकू शकेल, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. ‘नौटंकी की दुकान इज कमबॅक,’ अशा शब्दांत एका युजरने या शोला ट्रोल केलं आहे. ‘नेहा कक्करला हटवा, श्रेया घोषालला आणा’, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

‘इंडियन आयडल’चा 12 वा सीझनही असाच ट्रोल झाला होता. मागच्या सीझनमध्ये अरूणिता आणि पवनदीपची फेक लव्हस्टोरी दाखल्यावरून लोकांनी या शोला ट्रोल केलं होतं. याशिवाय  इंडियन आयडलमध्ये येणाºया स्पेशल गेस्टला स्पर्धकांचं कौतुक करायला सांगितलं जातं, असा एक आरोप सुद्ध झाला होता.

तुम्हाला आठवत असेलच की, किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल 12’च्या किशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये कंटेस्टंटने गायलेली किशोर कुमार यांची गाणी प्रेक्षकांना आवडली नव्हती. यावरून सोशल मीडियावर शोची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. यावर प्रतिक्रिया देताना अमित कुमार यांनी मला स्पर्धकांचं कौतुक करायला सांगितलं होतं आणि तेच मी केलं,असं उत्तर दिले होते. यावरूनही मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. 

टॅग्स :इंडियन आयडॉलटेलिव्हिजन