Join us

'इंडियन आयडॉल १२'मध्ये रेखा यांनी लग्नाची भेट म्हणून नेहा कक्करला दिली साडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 17:51 IST

या कार्यक्रमाच्या सेटवर ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आल्या होत्या.

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सिंगिग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.या कार्यक्रमाच्या सेटवर ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आल्या होत्या.  या मंचावर त्यांनी आपल्या जीवनातील किस्से सांगितले. या शोची जज नेहा कक्करसाठी त्यांनी एक गिफ्ट आणलं होते. रेखा यांनी नेहाला एक  सुंदर कांजीवरम साडी भेट म्हणून दिली. नेहाला ही भेट रेखा यांच्याकडून मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावत नव्हता. 

नेहा म्हणाली, “ही साडी म्हणजे आशीर्वाद आहे, जो मला रेखा मॅमकडून मिळाला आहे. ही साडी माझ्यासाठी नेहमीच खूप खास असेल. रेखाजी सगळ्यांनाच भारून टाकतात आणि मी देखील त्यातलीच एक आहे. त्यांना भेटणे आणि त्यांच्याकडून एक भेटवस्तू मिळणे हे माझ्यासाठी खूप विशेष आहे. माझा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.”

रेखा म्हणाल्या, “असे म्हणतात की, नवीन लग्न झालेल्या स्त्रीला पहिल्यांदा भेटताना तिला खूप आशीर्वाद द्यावेत. मला वाटते साडी हा एक अत्यंत सुंदर पोशाख आहे. म्हणून मी तिला साडीच द्यायचे ठरवले.”

टॅग्स :रेखानेहा कक्करइंडियन आयडॉल