Join us

Indian Idol 12: करिश्मा कपूरने 'या' ​कारणामुळे 'दिल तो पागल है'मध्ये काम करण्यासाठी दिला होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 19:39 IST

इंडियन आयडॉल सीझन १२च्या मंचावर करिश्मा कपूर हजेरी लावताना दिसणार आहे.

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन १२ च्या आगामी एपिसोडमध्ये भरपूर सांगितिक मेजवानी, मनोरंजन आणि प्रतिभेचे दर्शन होईल. प्रचंड ग्लॅमरसोबत या शो मध्ये करिश्मा कपूर स्पेशल एपिसोड साजरा केला जाणार आहे. एका सुंदर अशा संध्याकाळी, होस्ट आदित्य नारायण हे जज अनु मलिक, सोनू कक्कर आणि हिमेश रेशमियासोबत ६ स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचा आनंद घेतील. त्यात लोलोच्या प्रसिद्ध चित्रपटांची झलक दिसेल. इंडियन आयडॉल १२ च्या सेटवर करिश्माने दिल तो पागल है या प्रसिद्ध चित्रपटामागील कथा उलगडली, ज्यामुळे तिला तिचा निर्णय बदलावा लागला. ​करिश्मा म्हणाली की, मला दिल तो पागल है मध्ये अभिनयाची ऑफर मिळाली आणि मला आधी वाटले की, ती डान्स फिल्म आहे आणि माधुरी दीक्षितसोबत काम करायचे आहे? माधुरी दीक्षितजींसोबत कुणी डान्स करेल, म्हणून अनेक अभिनेत्यांनी याला नकार दिला. अखेर, यशजी आणि आदीने मला कथानक सांगितले. नंतर माझी आई मला म्हणाली, तू हे आव्हान स्वीकारले पाहिजे. ती (बबिता) हेदेखील म्हणाली की, तू माधुरी दीक्षितची मोठी चाहती आहेस, त्यामुळे तू हे केलच पाहिजेस. तू खूप मेहनत घे, अवश्य यशस्वी होशील.

करिश्मा कपूर पुढे म्हणाली की, ‘दिल तो पागल है हा तिच्यासाठी खूप स्पेशल चित्रपट आहे. उत्तम अभिनय करणे आणि त्यासाठीचे प्रयत्न या दोन्हींमध्ये शाहरूख खान आणि माधुरी जी हे दोघेही खूप प्रोत्साहन देत असतात.  

​या आठवड्यात, टॉप ६ स्पर्धक, करिश्मा कपूरचे प्रसिद्ध गाणी सादर करतील. याद्वारे इंडस्ट्रीतील तिच्या कामगिरीला उजाळा मिळेल. उत्साह, ग्लॅमर आणि मनोरंजनाने भारलेल्या संध्याकाळचा हा कार्यक्रम पहायला तुम्ही विसरू नका. 

टॅग्स :करिश्मा कपूरइंडियन आयडॉल