Join us

इंडियन आयडल १० च्या या स्पर्धकाला मिळाली ही मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 06:30 IST

चंद्रगुप्त मौर्य ही मालिका प्रचंड भव्य असल्याने या मालिकेच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये साठी या मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. या मालिकेच्या शीर्षक गीताला इंडियन आयडल १० मधील सर्वांचा आवडता गायक असलेल्या सलमान अलीने आपला आवाज दिला आहे.

ठळक मुद्दे15 वर्षीय चंद्रगुप्त मौर्य यांच्या भूमिकेत कार्तिकेय मालवीय दिसणार आहे.कोणत्याही रिअॅलिटी शोमधील मी पहिला कलाकार आहे, ज्याला एवढ्या भव्य कार्यक्रमाचं शीर्षकगीत गाण्याची संधी मिळाली आहे असे सलमान सांगतो.मी इंडियन आयडल आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझं गाण्याचं कौशल्य दाखवण्याची संधी दिली.

तरुण खन्ना (चाणक्य), सौरभ राज जैन (धन नंद) आणि विकास वर्मा (सेलेक्यूस) यांच्या पोरस या मालिकेत कार्तिकेय मालवीयची वर्णी लागली आहे. निर्माते सिद्धार्थ कुमार तिवारी यांनी बाल कलाकार कार्तिकेय मालवीय याला 'चंद्रगुप्त मौर्य'' च्या भूमिकेत घेतले आहे. पोरसची परिणती एका नवीन अध्यायाचा सुरुवात करेल, जे बहादुर राजा चंद्रगुप्त मौर्य यांचा उदय दर्शवेल. 15 वर्षीय चंद्रगुप्त मौर्य यांच्या भूमिकेत कार्तिकेय दिसणार आहे. तो जन्मजात हुशार आहे आणि एक अत्यंत तीक्ष्ण बुद्धी असलेला असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणत्याही संकटातून नेहमीच मार्ग काढणारा चंद्रगुप्त त्याच्या संघाचे नेतृत्व करतो आणि कधीही त्यांना हार पत्करू देत नाही. चाणक्य चंद्रगुप्तमधील ही विशेषण टिपतात आणि त्याला आपल्या पंखांखाली घेतात. ही भूमिका महत्त्वाची असल्याने कार्तिकेय त्याच्या भूमिकेची तयारी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे.

चंद्रगुप्त मौर्य ही मालिका प्रचंड भव्य असल्याने या मालिकेच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये साठी या मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. या मालिकेच्या शीर्षक गीताला इंडियन आयडल १० मधील सर्वांचा आवडता गायक असलेल्या सलमान अलीने आपला आवाज दिला आहे. एका मालिकेचे शीर्षक गीत गाण्याची संधी मिळाल्याने सलमान सध्या चांगलाच खूश आहे.

चंद्रगुप्त मौर्य या मालिकेचे शीर्षक गीत गाण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना सलमान सांगतो, "चंद्रगुप्त मौर्यसारख्या कार्यक्रमाचा भाग होणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. कोणत्याही रिअॅलिटी शोमधील मी पहिला कलाकार आहे, ज्याला एवढ्या भव्य कार्यक्रमाचं शीर्षकगीत गाण्याची संधी मिळाली आहे. या विलक्षण कार्यक्रमामध्ये चंद्रगुप्त मौर्यची उदात्त कहाणी सांगितली जाणार आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना हा कार्यक्रम नक्की आवडेल. मी इंडियन आयडल आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझं गाण्याचं कौशल्य दाखवण्याची संधी दिली."

चंद्रगुप्त मौर्य ही मालिका लवकरच सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर सुरू होत आहे.

 

 

टॅग्स :इंडियन आयडॉलपोरस