Join us

'जीव माझा गुंतला'मध्ये अशी साजरी होणार अंतरा- मल्हारची पहिली मकरसंक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 15:08 IST

Jeev Majha Guntala : मल्हारच्या साथीमुळे अंतरा मोठ्या संकटातून बाहेर पडली आहे.

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला (JeevMajhaGuntala) मालिकामध्ये रोज नवे ट्विस्ट आणि टर्नस येतात. मल्हारच्या साथीमुळे अंतरा मोठ्या संकटातून बाहेर पडली आहे. या संकटात मल्हारने अंतराची सावलीसारखी साथ दिली, तिच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला. लग्नानंतर अंतराशी भांडणार, तिच्यावर तितकासा विश्वास नसणार मल्हार आता अंतराच्या बाजूने लढताना प्रेक्षकांना बघायला मिळाला. मालिकेत खानविलकर कुटुंबायानी अंतराचा गृहप्रवेश केला. 

मल्हारने केलेली मदत आणि तिला मिळणारा पाठिंबा कुठेतरी चित्रा आणि श्वेताला पटत नाहीये आणि आता या दोघी मिळून नक्कीच काहीतरी कटकारस्थान करताना दिसणर आहेत. पण, आता येत्या भागामध्ये अंतरा आणि मल्हार त्यांची पहिली मकर संक्रांत साजरी करणार आहेत. अंतरा अतिशय सुंदर तयार झाली आहे. काळ्या रंगाची साडी आणि दागिने तिच्यावर शोभून दिसत आहेत. हळदी कुंकु देखील पार पडणार असून अंतरा वाण म्हणून तुळशीचे रोप देणार आहे. आता ही संक्रांत निर्विघ्नपणे पार पडणार की चित्रा – श्वेता यातदेखील डाव रचणार बघूया जीव माझा गुंतला मालिकेमध्ये. 

टॅग्स :कलर्स मराठीटिव्ही कलाकार