Join us

‘द व्हॉइस’मधील स्पर्धक सुमित सैनी आहे या अभिनेत्याचा चाहता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 07:15 IST

‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील दर्जेदार स्पर्धक आणि त्यांचे गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण यामुळे या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मोहून टाकले आहे.

स्टार प्लसवरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील दर्जेदार स्पर्धक आणि त्यांचे गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण यामुळे या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. या कार्यक्रमातील प्रशिक्षक आणि प्रेक्षक यांच्याशी अचूक नाते जोडलेला एक स्पर्धक म्हणजे सुमित सैनी. आपल्या दमदार आवाजातील गाण्यांनी त्याने लक्षावधी प्रेक्षकांची मने जिंकली असून त्याने गायलेल्या किन्ना सोणा तेणू रब ने बनाया या गाण्याने त्याने प्रशिक्षकांवर आपली मोहिनी टाकली आणि हर्षदीप कौरच्या टीममध्ये स्थान पटकाविले. आता महाशिवरात्रीचा उत्सव तोंडावर येऊन ठेपला असून या निमित्ताने सुमित सैनीने आपले एक गुपित उघड केले. ते म्हणजे तो स्वत: अजय देवगणचा प्रचंड मोठा चाहता आहे आणि हे दोघेही शंकराचे मोठे भक्त आहेत.

याबाबत सुमित म्हणाला, “मी अजय देवगण सरांचा फार मोठा चाहता आहे आणि मला त्यांच्याबरोबर वाटते. आम्ही दोघेही शिवभक्त आहोत आणि या नात्याने आम्ही एकमेकांना जोडले गेलो आहोत. अजय देवगणसरांनी आजवर आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की आपल्यात काही अपूर्णत्व असलेला एकमेव देव म्हणजे शंकर आहे आणि म्हणूनच त्यांना शंकरात प्रत्येक व्यक्ती दिसते. कारण आपण मानवही अपूर्णच असतो. अजय देवगण यांच्या शरीरावरील गोंदणातूनही त्यांचे शिवप्रेम दिसून येते.”एका धार्मिक वृत्तीच्या शेतकरी कुटुंबातील सुमित सैनी या स्पर्धकाने ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’च्या प्रेक्षकांवर आपल्या आवाजाची मोहिनी टाकली आहे. सुपरगुरू ए. आर. रेहमान यांच्यासह अदनान सामी, हर्षदीप कौर, अर्मान मलिक आणि कनिका कपूर हे अन्य प्रशिक्षकही सुमितला या स्पर्धेत पुढे जाण्यास सर्वतोपरी मदत करीत आहेत.

 

टॅग्स :द व्हॉइस शोअजय देवगणस्टार प्लस