Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रात्रीस खेळ चाले'मधील शेवतांला या गोष्टीचा आहे सर्वात जास्त आनंद, ऐकून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 07:15 IST

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे.

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. सोशल मीडियाच्या युगात आजकाल एखादी गोष्ट अगदी काही सेकंदातच लोकांपर्यंत पोचते. तसेच हे माध्यम सुलभ असल्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया देखील या माध्यमावर लगेचच उमटतात. तसंच सध्या प्रत्येक नव्या गोष्टीवर मिम्स देखील वायरल होताना आपण पाहत आहोत. अण्णा आणि शेवंता या व्यक्तिरेखांवरदेखील असंख्य मिम्स बनतात.

याबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली, "सुरुवातीला मला खूप हसू यायचं, की मिम्स बनवायला कुणाकडे एवढा वेळ आहे. शेवंताला येऊन नऊ-दहा महिने झाले आहेत. पण, प्रेक्षकांचा उत्साह कमी झालेला नाही. व्हॉट्सअपला असे बरेच ग्रुप्स आहेत ज्यावर डीपी म्हणून शेवंताचा फोटो आहे. याचा मला खूप आनंद होतो. सगळ्या वयोगटांमध्ये आज शेवंता आणि अण्णांची चर्चा आहे. या गोष्टीचा मला आनंद होतो. याचं सगळं श्रेय मी आमचे दिग्दर्शक आणि कॅमेरामनला देईन."

टॅग्स :रात्रीस खेळ चालेझी मराठी