Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hruta Durgule : हृता दुर्गुळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ठरली पॉप्युलर फेस ऑफ दि इअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 07:00 IST

अनन्या’, ‘टाईमपास ३’ या दोन्ही चित्रपटांमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली.

टेलिव्हिजन ते चित्रपट असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule). अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. दुर्वा, फुलपाखरु आणि मन उडू उडू झालं मालिकेतून हृताला खूप लोकप्रियता मिळाली. ‘अनन्या’, ‘टाईमपास ३’ या दोन्ही चित्रपटांमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली. हृता त्यात आता  झी टॉकीज वाहिनीने महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस ऑफ द इयर ठरली आहे. 

झी टॉकीज वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यातील सर्वात लोकप्रिय चेहरा या पुरस्कार ह्रताने पटकावला आहे .रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

मराठी मनोरंजन विश्वात  मानाचा समजला जाणारा "महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? "हा पुरस्कार सोहळा घेऊन यावर्षी पुन्हा एकदा झी टॉकीज ही वाहिनी रसिकांच्या भेटीला आली आहे.  झी टॉकीज वाहिनीतर्फे दरवर्षी जाहीर होणाऱ्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. 

हृता दुर्गुळेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. हृताने दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती फुलपाखरु या मालिकेत झळकली. या मालिकेमुळेच तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. हृताने अनन्या आणि टाइमपास ३ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

 

टॅग्स :ऋता दूर्गुळेटिव्ही कलाकार