मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि तिचा नवरा प्रतीक शाह (Prateek Shah) नेहमीच कपल गोल्स देतात. हे जोडपं अनेकदा परदेश दौऱ्यावर असतं. त्यांचे रोमँटिक फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकतंच प्रतीक शाहने आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवस आणि न्यू इयर निमित्त दोघंही सध्या अझरबैजान मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. हृता नवऱ्यासोबत रोमँटिक झाली असून तिने पोस्ट शेअर केली आहे.
युरोपमधील अझरबैजान हे सध्या अनेक पर्यटकांचं आकर्षण आहे. पूर्व युरोपातील हा एक देश आहे. हृता आणि प्रतीकही यंदा त्याच दौऱ्यावर गेलेले दिसत आहे. त्यांचे बर्फातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. नवऱ्यासोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर करत हृताने लिहिले, "जिथे प्रेम चिरंतन वाटतं... दगडांवर कथा कोरलेल्या असतात...प्रत्येक मार्गाची एक कहाणी असते...जिथे शतकं चालली आणि प्रेमात एखाद्याचं साम्राज्यही हललं."
त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. ही जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे.अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. हृताने १८ मे २०२२ ला प्रतिक शाहशी लग्न केलं होतं. हृता-प्रतीकच्या सुखी संसाराला २ वर्षे पूर्ण झाली आहेत.