Abhinav Shukla: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अभिनव शुक्ला सध्या चर्चेत आहे. अनेक गाजलेल्या मालिका, रिअॅलिटी शोमध्ये झळकून त्याने प्रेक्षकांचं मिळवलं. अलिकडेच 'पती पत्नी और पंगा' या रिअॅलिटी शोमुळे तो प्रसिद्धीझोतात आला आहे. या शोमध्ये पत्नी रुबिना दिलैक देखील त्याच्यासोबत होती. या जोडीने या पर्वाच्या ट्रॉफिवर आपलं नाव कोरलं आहे. नुकताच अभिनवने सोशल मीडियावर व्हिडीओ एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
अभिनव शुक्लाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अभिनवने त्याच्या बाबतीत घडलेला एक स्कॅम उघड केला आहे. तो एका ऑनलाइन फसवणुकीची शिकार झाला आहे. अलिकडेच अभिनव शुक्ला पहिल्यांदाच लोन घेण्यासाठी बँकेत गेला होता. पण सिव्हिल स्कोअर चेक करताना आपलं पॅनकार्ड वापरून अगोदरच ५-६ लोकांनी कर्ज घेतलं होतं हे त्याला कळलं. खरं तर त्याच्यासाठी हा मोठा धक्काच होता. अर्थात या गोष्टींमुळे त्याला कुठलेही आर्थिक नुकसान झाले नाही पण आपलं पॅनकार्ड वापरुन कोणीतरी कर्ज घेतंय हेच त्याच्यासाठी धक्कादायक होतं.
अभिनवने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये म्हटलंय, 'माझ्यासोबत एक फसवणुकीचा प्रकार घडला. मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून इतर कोणासोबतही असा प्रकार घडू नये. कदाचित असंही होऊ शकतं की हा फ्रॉड तुमच्यासोबत होत असेल आणि तुम्हाला माहीतही नसेल. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कर्जासाठी अर्ज केला आणि जेव्हा मला माझा CIBIL रिपोर्ट आला, तेव्हा बँकेकडून मला सांगण्यात आलं की, माझ्या नावावर आधीच पाच-सहा जणांनी कर्ज घेतलं आहे. माझ्या पॅन कार्डचा वापर करून, त्या लोकांनी बनावट ईमेल आयडी तयार केलाय आणि माझ्या पॅन कार्डचा वापर करून वेगवेगळ्या नंबर आणि पत्त्यांवरून अनेक कर्ज घेतली आहेत. "
त्यानंतर पुढे अभिनव म्हणाला,"सुदैवाने माझ्या खात्यातून पैसे गेलेले नाहीत,पण मला ते कर्ज काढता आले नाही. कर्ज मिळविण्यासाठी मला सर्वात आधी माझा CIBIL रिपोर्ट दुरुस्त करावा लागेल.तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशात गोष्टी कशा चालतात,सर्वात आधी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करावा लागेल, नंतर CIBIL अधिकाऱ्यांना अर्ज द्यावा लागेल आणि त्यानंतर काय होईल मला माहीतही नाही. ही एक मोठी प्रक्रिया आहे.पण,मला त्या लोकांना सांगावंस वाटतंय की, जर तुम्ही कधीही कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेतलं नसेल, तर कृपया तुमचा CIBIL स्कोअर तपासा. तुमच्या नावावरही अशाप्रकारे फ्रॉड होऊ शकतात."
Web Summary : Actor Abhinav Shukla discovered his PAN card was used for fraudulent loans. He urges everyone to check their CIBIL score to prevent similar scams. He is now working to fix his credit report.
Web Summary : अभिनेता अभिनव शुक्ला को पता चला कि उनके पैन कार्ड का इस्तेमाल धोखाधड़ी वाले ऋणों के लिए किया गया था। उन्होंने सभी से आग्रह किया कि वे इसी तरह के घोटालों को रोकने के लिए अपने सिबिल स्कोर की जांच करें। वह अब अपनी क्रेडिट रिपोर्ट को ठीक करने के लिए काम कर रहे हैं।