Join us

क्रिकेटपटूसोबत जोडलं नाव, लग्नाच्याही चर्चा रंगल्या! प्रसिद्ध अभिनेत्रीने 'त्या' अफवांवर व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 11:06 IST

"मी त्याला ओळखत नाही...", क्रिकेटपटू शुभमनगिलसोबतच्या अफेअर्सच्या चर्चा ऐकून अभिनेत्री भडकली,म्हणते-"माझ्या घरच्यांना…"

Ridhima Pandit: टीव्ही अभिनेत्री  रिधिमा पंडित हे इंडस्ट्रीतील चर्चेत असणारं नाव आहे. आजवर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. बहु हमारी रजनीकांत या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. याशिवाय रिद्धिमाने बिग बॉस ओटीटी,खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकली आहे. रिद्धिमाच्या तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे.दरम्यान, एकेकाळी रिधिमा पंडितचं नाव भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडण्यात आलं होतं.  तसंच असंही म्हटलं जातं होतं की ते दोघेही लग्न करणार आहेत. त्या अफवांवर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.

'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत रिधिमाने शुभमन गिलबरोबरच्या अफेअर्सच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. या अफवांवर नाराजी व्यक्त करत अभिनेत्रीने अफवा पसरवणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. या मुलाखतीमध्ये आपली बाजू मांडत रिद्धिमा म्हणाली, " एक क्रिकेटर आहे ज्याला मी ओळखत नाही, तसंच आजवर कधी भेटले सुद्धा नाही. पण, आमच्याबद्दल प्रचंड अफवा पसरवल्या गेल्या.काही लोकांचं असंही म्हणणं होतं की, या अफवा आम्ही प्रसिद्धीसाठी पसरवल्या.पण, मला याची कधी गरजच वाटली नाही. हे सगळं कुठून येतं मला माहित नाही."

त्यानंतर अभिनेत्रीने म्हटलं," मी खरं सांगते आम्ही कधीच भेटलो नाही.एका पार्टीमध्येच मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. मात्र, तो एकटाच तिथे नव्हता तर बरेच सेलिब्रिटी देखील त्या ठिकाणी होते. या अफवा अशा पसरवल्या गेल्या की हे सगळं मीच केलं आहे. या गोष्टींमुळे मी खूप डिस्टर्ब झाले."

शुभमन गिलबद्दल रिधिमा पंडित काय म्हणाली?

"मला हेच कळत नव्हतं की लोकांना कसं सांगू. त्या व्यक्तीचा आमच्या इंडस्ट्रीसोबत कोणताही संबंध नाही.आम्ही कधी भेटलोही नाही.मग अशा भयंकर अफवा कशा पसवल्या गेल्या. या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या घरच्यांना देखील खूप त्रास झाला. कारण, लोकांना नेहमी क्रिकेटर्स योग्य आणि  कलाकार चुकीचे वाटतात. "

English
हिंदी सारांश
Web Title : Ridhima Pandit slams rumors of affair and marriage with cricketer.

Web Summary : Ridhima Pandit refuted rumors linking her to cricketer Shubman Gill, denying any relationship or marriage plans. She expressed dismay at the baseless gossip and its impact on her family, clarifying they've never even met properly and the rumors were damaging.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी