Ridhima Pandit : कलाकार म्हटलं की त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते असतात. कोणी त्यांची स्टाईल कॉपी करत असतं तर कोणी त्यांचा वागण्या-बोलण्याची शैली आत्मसात करत असतं. परंतु, काही कलाकार असेही असतात जे आपल्या कामासह, जनजागृती करण्यात ही महत्त्वाची भूमिका बजावतात. समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते. सध्या मनोरंजनविश्वात अशाच लोकप्रिय अभिनेत्रीच्या एका निर्णयाची सगळीकडे चर्चा होताना दिसते आहे. ही अभिनेत्री म्हणजे रिद्धिमा पंडित (Ridhima Pandit). आपल्या हटके कलाकृतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिद्धिमाने मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्री रिद्धिमा पंडित हे हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय असं नाव आहे. सध्या नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टनुसार, ३५ वर्षीय रिद्धिममाने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीच्या पश्चात गरजू व्यक्तीला तिचे डोळे दान करण्यात येणार आहे. आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून अभिनेत्रीने हा निर्णय घेतला. मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. त्यात मरणोत्तर नेत्रदानातून आपण त्या लोकांना हे सुंदर जग पाहण्याची दृष्टी प्रदान करू शकतो. अभिनेत्री रिद्धिमाच्या या निर्णयाचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
वर्कफ्रंट
'बहु हमारी रजनीकांत' या मालिकेतून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिद्धिमा पंडीत . 'बिग बॉस ओटीटी'मध्ये ती अखेरची झळकली होती. रिद्धिमा 'खतरा खतरा' सारख्या टीव्ही शोसाठी ओळखली जाते. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्येही ती दिसली होती. एकता कपूरच्या बेबसिरीजमध्ये तिने काम केले आहे.