Join us

'प्रत्येकाची चांगली बाजू दाखवली जात नाही...' नायरा बॅनर्जीचं 'बिग बॉस'वर वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:04 IST

अभिनेत्री नायरा बॅनर्जी (Nyra Banerjee) हे हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय नाव आहे.

Nyra Banerjee: अभिनेत्री नायरा बॅनर्जी (Nyra Banerjee) हे हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. बॉलिवूडसह टॉलिवूड सिनेमांमधून अभिनयाची छाप सोडणाऱ्या या अभिनेत्री प्रेक्षकांना आपलंसं केलं. याशिवाय 'खतरों के खिलाडी सीझन -१३ आणि बिग बॉस १८ च्या पर्वात सहभागी होऊन ती सर्वाधिक चर्चेत राहिली. अशातच अलिकडेच नायरा बॅनर्जीने लोकमत फिल्मीसोबत संवाद साधला. त्यादरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले.  'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नायरा बॅनर्जीला 'बिग बॉस' हा शो स्क्रिप्टेड आहे, असं अनेकदा म्हटलं जातं, या अफवांमध्ये काही तथ्य आहे का? असं प्रश्न विचारण्यात आला. त्याविषयी बोलताना नायरा म्हणाली, "'बिग बॉस' स्क्रिप्डेट असतो किंवा नसतो याबद्दल काही माहिती नाही. पण, त्यामध्ये प्रत्येक सदस्याला पूर्णपणे दाखवलं जात नाही हे मी जवळून पाहिलं आहे. कसं शक्य आहे की, घरामध्ये सगळीकडे कॅमेरे असताना मी कुठेच  दिसत नाही, असं आपल्याला सांगितलं जातं. माझा यावर विश्वास नव्हता. पण हेही तितकंच खरं आहे की, या शोमध्ये प्रत्येकाची चांगली बाजू दाखवली जात नाही. असा खुलासा तिने केला.

दरम्यान, नायरा बॅनर्जीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'वन नाइट स्टँड' आणि 'कमाल धमाल-मालामाल' यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये देखील तिने काम केलं आहे. याशिवाय एक्सक्यूझमी मॅडम या वेब सीरिजमध्येसुद्धा ती झळकली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीबिग बॉस