Join us

लग्नासाठी २ लाखांची ऑफर अन् दिग्दर्शकाकडून शरीर सुखाची मागणी; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 11:08 IST

लग्नासाठी २ लाखांची ऑफर अन् दिग्दर्शकाकडून शरीर संबंधाची मागणी; 'क्योंकी सास भी...', फेम अभिनेत्रीने सांगितला वाईट अनुभव 

Jaya Bhattacharya : जया भट्टाचार्य (Jaya Bhattacharya) या टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. जया भट्टाचार्य यांनी 'कोशिश','क्योंकी सांस भी कभी बहू थी','विरासत','झांसी की रानी','प्यार की थपकी' यासह ४० पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर 'सिर्फ तुम', 'फिजा', 'लज्जा','एक विवाह ऐसा भी','मिमी,'देवदास' या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या ही अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच मुलाखतीमध्ये या अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल गोष्टींबद्दल खुलासा केला आहे.

नुकतीच जया भट्टाचार्जीने 'सिद्धार्थ कन्नन'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आयुष्यातील वाईट प्रसंगाविषयी भाष्य केलं. त्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "ही त्यावेळी गोष्ट आम्ही  लखनऊमध्ये राहायचो. मी त्यावेळी १७-१८ वर्षांची होते आणि ११वीत शिकत होते. तेव्हा एक काका आमच्या घरी यायचे, त्यांनी मला गाडी कशी चालवायची हे शिकवलं होतं. ते आमच्या घरी वारंवार येत असत, पण हळूहळू त्यांच्याबद्दल अशा चर्चां कानावर येऊ लागल्या की त खूप डेंजर आहे. त्यांचे राजकीय संबंध असून ते माफियांशी देखील संबंध होते. एके दिवशी त्या व्यक्तीने मला मुंबईत यायला सांगितलं, पण मी नकार दिला."

त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली, "मी जिथे जायचो तिथे तो माणूस माझ्या मागे यायचा. असंच एके दिवशी त्या माणसाने माझ्या आईवडिलांना सांगितलं की तो माझ्याशी लग्न करायचं आहे. मी झोपले असताना हे सगळं ऐकलं होतं. आम्हाला त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. मग आम्ही दूरदर्शनच्या ऑफिसमध्ये गेलो, त्याचे मित्र तिथे होते. त्यांनी आम्हाला सांगितले की तो माणूस विवाहित आहे आणि त्याला मुलंही होती. मग आम्ही त्याचा पत्ता घेतला आणि त्याच्या घरी गेलो. त्यानंतर मग त्याने आमच्या घरी येणं बंद केलं."

लग्नासाठी दिली २ लाखांची ऑफर...

या घटनेविषयी सांगताना अभिनेत्रीने म्हटलं, काही दिवसानंतर तो माणूस पुन्हा आमच्या घरी येऊ लागला. असं असाताना तो एका दिवशी मला घरापासून काही अंतरावर असलेल्या स्टेशनवर सोडण्यासाठी आला. त्यांचं विचित्र वागणं पाहून मी त्यांना विचारलं की तुम्हाला नक्की काय हवंय? तर तो म्हणाला की, त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. साधारण ते १९९१-९२ सालची ही गोष्ट आहे. बरं तो माणूय एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने मला लग्नासाठी चक्क २ लाख रुपये हुंडा देईन असं तो म्हणाला. मी स्पष्टपणे त्याला बजावून सांगितलं, यापुढे तू आमच्या घरी यायचं नाही. याचदरम्यान, इंडस्ट्रीत तीन लोकांनी मला त्रास दिला होता पण रहीमजीमुळे ते काही करू शकले नाहीत. त्यापैकी एका मोठ्या दिग्दर्शकाने मला त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवायला सांगितले होते.' त्या मजहिर रहीमसोबत बरीच वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होत्या. असंही अभिनेत्रीने सांगितलं." 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी