Join us

लेस्बियन असल्याचा आरोप, बिकनीमुळे झालेली ट्रोल; कायम वादात राहिलं 'या' अभिनेत्रीचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:51 IST

लेस्बियन असल्याचा आरोप, बिकनीमुळे झालेली ट्रोल; कोण आहे ती?

Tv Actress : छोट्या पडद्यावरची अभिनेत्री अंजुम फकिहला 'कुंडली भाग्य' या मालिकेतून घराघरात तिला लोकप्रियता मिळाली. ही अभिनेत्री सध्या 'छोरियॉं  चली गावं में' या शो मुळे प्रचंड चर्चेत आहे. आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावणाऱ्या या अभिनेत्रीला तिच्या कारकिर्दीत अनेक वादांना सामोरं जावं लागलं आहे. तिच्यावर अनेक आरोप झाले आहेत आणि अनेक वेळा या अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. आज या नायिकेचा वाढदिवस आहे,याच निमित्ताने तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात...

अंजुम फकीह हा हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा बनला आहे.'एक था राजा एक थी रानी', 'कुंडली भाग्य' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे.याशिवाय अंजुम स्प्लिट्सव्हिलाच्या चौथ्या सीझनमध्येही सहभागी झाली होती. मात्र, अभिनयापेक्षा या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा झाली. सहकलाकार  अभिनेत्रीसोबत काढलेल्या एका फोटोमुळे तिच्यावर लेस्बियन असल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवाय तिने केलेल्या बिकनी फोटोशूटमुळेही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. 

नेमकं काय घडलेलं?

कुंडली भाग्य मालिकेत श्रद्धा आणि अंजुम या दोघी सख्य बहि‍णींची दाखवण्यात आल्या होत्या. मालिकेत ऑनस्क्रिन बॉण्डिंगप्रमाणे त्या ऑफस्क्रिन देखील एकमेकींच्या खूप जवळ आहेत. त्यांच्या मैत्रीची प्रचिती सोशल मिडिया पोस्टमुळे येते. पण, अंजुमने श्रद्धाबरोबरचा एक फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर तिच्याबद्दल वाऱ्यासारखी बातमी पसरली गेली. या फोटोंमध्ये श्रद्धा आर्याने तिच्या छातीवर हात ठेवला होता.त्या फोटोमुळे सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले होते. असे फोटो पोस्ट करणं योग्य नाही अशी मतं देखील मांडण्यात आली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी