Nakul Mehta: 'बडे अच्छे लगते है-2,'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा','इश्कबाज'यांसारख्या हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे नकुल मेहता. टेलिव्हिजन विश्वातील या लोकप्रिय अभिनेत्याने काही महिन्यांपूर्वीच तो लवकरच बाबा होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती. नकुल आणि त्याची पत्नी जानकी पारेख यांनी सोशल मीडियावर खास अंदाजात फोटो शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्याचं पाहायला मिळालं.त्यात आता नकुलच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. याबद्दल अभिनेत्याने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
नकुल मेहताने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याला मुलगी झाल्याची गुडन्यूज दिली आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी त्याच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याने त्याच्या मुलीची पहिली झलकही शेअर केली आहे.या फोटोंमध्ये नकुलचा मुलगा सुफीच्या मांडीवर चिमुकली दिसते आहे.त्याचबरोबर दुसऱ्या या फोटोमध्ये अभिनेता त्याच्या लाडक्या लेकीकडे कुतुहलाने एकटक पाहतो आहे. तर तिसऱ्या फोटोत त्याची पत्नी डिलिव्हरीला जातानाचे क्षण त्याने यामार्फत शेअर केले आहेत. यासोबत त्याने सुंदर कॅप्शन देत लिहिलंय की, "वो आ गयी है, सुफीसोबत फायनली त्याची रुमी आहे.आम्ही प्रचंड आनंदी आहोत.दरम्यान, नुकल आणि त्याच्या पत्नीवरहिंदी कलाविश्वातील सेलिब्रिटी आणि त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
अभिनेता नकुल मेहता आणि जानकी पारेख यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली.या जोडप्याला एक ५ वर्षांचा गोंडस मुलगा देखील आहे. त्यांतर अभिनेता आता वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.अभिनेता नकुल मेहताची पत्नी जानकी पारेख एक गायिका आहे.शिवाय तिचे अनेक गाण्यांचे व्हिडिओ YouTube वर खूप लोकप्रिय आहेत.