मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिकेचा आज वाढदिवस. कुशलने विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलंय. कुशलने चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून स्वतःमधील विनोदी अभिनेत्याला सिद्ध केलं. याशिवाय युट्यूबवर स्ट्रगलर साला या वेबसीरिजच्या माध्यमातून कुशलने सर्वांना खळखळून हसवलं. कुशलच्या वाढदिवसानिमित्त त्याची खास मैत्रीण आणि सहकलाकार हेमांगी कवीने केलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाली हेमांगी?
हेमांगीची कुशलच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
हेमांगीची कुशलसोबतचा खास फोटो पोस्ट करुन लिहिते की, "२००५ पासून ते २०२४ पर्यंत, एकांकीका स्पर्धा ते हिंदीतला comedy show पर्यंत, दर काही वर्षांच्या interval नंतर आपण कायम एकमेकांना भिडत आलोय! इतक्या वर्षात मैत्री नाही दोस्ती बहरली आपली (मैत्री आणि दोस्तीतला फरक आपणच जाणो फक्त ) प्रत्येक project च्या समाप्तीला वाटतं आता परत कधी काम करायला मिळेल या mad माणसासोबत आणि नियती काही न काही घेऊन येतेच आपल्यासाठी! या नियतीची अशीच कृपादृष्टी राहो आपल्यावर!"