Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी २ : घरात का ढसाढसा रडायची वेळ आली हिना पांचाळवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 16:29 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हिना पांचाळची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. घरामध्ये आल्यावर बऱ्याच सदस्यांना ती उत्तम खेळाडू वाटू लागली.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हिना पांचाळची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. घरामध्ये आल्यावर बऱ्याच सदस्यांना ती उत्तम खेळाडू वाटू लागली. हिना नेहाच्या आणि माधवच्या खूप जवळची मैत्रीण बनली. शिव वीणा आणि हिनामध्ये बरेच खटके उडत असतात. पण, गेल्या काही दिवसांपासून हिना नेहा आणि माधव या तिघांमध्ये वादावादी होताना दिसत आहे. कॅप्टनसी टास्कमध्ये नेहा आणि हिना मध्ये वाद झाला जो रुपालीने सोडवण्याचा प्रयत्न केला. माधवला हिनाचे वागणे खटकायला सुरुवात झाली आहे. माधवला हिनाने कालच्या भागामध्ये विचारले तुझे डोके का फिरले होते. त्यावर त्याचे म्हणणे होते मला नका सांगू काय करायचे मला कळत काय करायचं. टास्क मध्ये जे नाही बोलायचे तेच तुम्ही बोलताय, छोट्या छोट्या गोष्टी नका सांगू मला. हिनाचे वैशालीच्या सांगण्यावरून लगेच तिच्याशी जाऊन बोलणे माधवला खटकले आणि त्याने ते तिच्याकडे व्यक्त देखील केले, ते आपल्याशी बोलायला आले का ? त्यावर हिनाचे म्हणणे होते, माझे वैशालीशी नाते तसे आहे म्हणून मी गेले. माधव म्हणाला तुझ नात चांगलं आहे तरी ती नाही आली तुझ्याकडे बोलायला. तू टास्क करताना नाही जाणार असे म्हणाली तरीदेखील गेलीस वैशालीकडे गप्पा मारायला ते मला नाही आवडलं. हिनाचे म्हणणे होते तुम्हांला माझ्याशी नव्हते बोलायचे म्हणून मी तिकडे गेले. आणि हा वाद पुढे वाढतच गेला.

हिनाला अश्रू अनावर झाले.  माधव आणि शिवानीने तिला विचारले देखील नक्की काय झाले. त्यावर हिनाने माधवशी बोलण्यास नकार दिला पण नंतर तिला काय खटकत आहे हे तिने माधवकडे व्यक्त केले. माधवने स्पष्टीकरण दिले, प्रत्येकासाठी मैत्रीची व्याख्या वेगळी आहे, जरा काही झाल कि मस्का मारा हि माझ्यासाठी मैत्री नाही. जेव्हा गरज असेल तेंव्हा मी नक्कीच मदतीला येणार. माझी मैत्रीण रडते आहे, याचं मला वाईट वाटते आहे म्हणून मी तुला विचारतो आहे. हिनाचे म्हणणे पडले मी तुला तुझ्या वाईट गोष्टींबरोबर स्वीकारलं आहे. माधवने विचारले, तुझ्यासाठी मैत्री म्हणजे काय ? तुझ्या काय अपेक्षा आहेत माझ्याकडून कळू दे मला ? मला जमलं तर करेन मी? हिनाचे म्हणणे आहे तुम्ही ज्याप्रकारे वागता माझ्याशी त्याचा मला त्रास होता. तुम्हाला काही प्रोब्लेम असेल तर मला येऊन एकदाच सांग मागे बोलू नकोस किंवा टोंबणे नको... 

टॅग्स :बिग बॉस मराठीहिना पांचाळ