Join us

'हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परबचा मोबाइल चोरट्यांनी लांबवला, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 06:37 IST

एका हास्य रिॲलिटी शाेमधील अभिनेत्री शिवाली परब हिचा माेबाइल रविवारी सकाळी चाेरट्यांनी हिसकावला.

भिवंडी :

एका हास्य रिॲलिटी शाेमधील अभिनेत्री शिवाली परब हिचा माेबाइल रविवारी सकाळी चाेरट्यांनी हिसकावला. दुचाकीवरून आलेल्या दाेघांनी शिवाली यांच्या हातातून माेबाईल हिसकावून धूम ठाेकली. 

कल्याण येथे राहणाऱ्या शिवाली या मीरा रोड येथे शुटिंगसाठी रिक्षाने जात हाेत्या. रविवारी सकाळी ८.४५ वाजता मुंबई - नाशिक महामार्गावरील रेल्वेपुलाजवळ पिंपळास फाटा येथे रिक्षा आली असता दाेन दुचाकीस्वार रिक्षाजवळ आले. त्यांनी शिवाली यांच्या हातातील महागडा माेबाईल फाेन हिसकावून धूम ठाेकली. याप्रकरणी शिवाली यांनी दिलेल्या तक्रारीवरून काेनगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनचोरी