Join us

काय? सुरु होता होताच संपणार 'बडे अच्छे लगते है ४'! मेकर्सने 'या' कारणामुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:08 IST

जून मध्ये सुरु झालेला २ महिन्यातच बंद होणार आहे. काय आहे कारण?

'बडे अच्छे लगते है' (Bade Achhe Lagte Hai) ही मालिका राम कपूर-प्रिया या जोडीमुळे प्रसिद्ध झाली. राम कपूर आणि साक्षी तन्वरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. तसंच मालिकेची कथाही खूप भावली. नंतर मालिकेचे दोन पार्ट आले. तेही बरे चालले. तर नुकताच याचा चौथा भागही सुरु झाला. हर्षद चोप्रा (Harshad Chopda) आणि शिवांगी जोशी (Shivangi Joshi)  मुख्य भूमिकेत दिसले. मात्र हा शो आता सुरु होता होताच संपणार आहे. जून मध्ये सुरु झालेला २ महिन्यातच बंद होणार आहे. काय आहे कारण?

हर्षद चोप्रा आणि शिवांगी जोशी यांची 'बडे अच्छे लगते है ४' मालिका १६ जून रोजी सुरु झाली. मालिकेचं चांगलं प्रमोशन करण्यात आलं. या जोडीलाही प्रमोट करण्यात आलं. फिल्मीबीट रिपोर्टनुसार, आता दोन महिन्यातच मालिका संपणार आहे. कारण मालिकेला म्हणावा तसा टीआरपी मिळालेला नाही. या लोकप्रिय फ्रँचायझीचा चौथा भाग प्रेक्षकांना प्रभावित करण्यात कमी पडला आहे. प्रेक्षकांच्या मनात हर्षद आणि शिवांगी स्थान मिळवू शकले नाहीत. यामुळे मेकर्सने शोची रेटिंग सुधारण्यासाठी कैक प्रयत्न केले. मात्र काहीच फायदा झाला नाही. अखेर वाहिनीने शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

१८ सप्टेंबर रोजी मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. राम कपूर आणि साक्षी तन्वर यांनी 'बडे अच्छे लगते है' मालिका गाजवली होती. नंतर मालिकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात नकुल मेहत आणि दिशा परमार दिसले. त्यांनाही यश मिळालं. त्यामुळे चौथ्या भागालाही यश मिळेल असा मेकर्सला आत्मविश्वास होता. मात्र तसं होऊ शकलं नाही. अखेर मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन