Join us

Birthday Special : कॉमेडियन भारती सिंहच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 12:24 IST

आज याच भारतीचा वाढदिवस आहे. आपल्या कॉमेडिच्या माध्यमातून भारती प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करते. पण ती इथपर्यंत कशी आली?

मुंबई : स्टॅंडअप कॉमेडियन भारती सिंहची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाहीये. आज ती टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय कलाकार आहे. आज याच भारतीचा वाढदिवस आहे. आपल्या कॉमेडिच्या माध्यमातून भारती प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करते. पण ती इथपर्यंत कशी आली? तिचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? हे फार कमी लोकांनी माहीत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊ...

1) भारती ही एका मध्यमर्गीय कुटूंबातील असून परिवारात तिघे भाऊ-बहीण आहेत. भारतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या आईचं वयाच्या 17 व्या वर्षीच लग्न झालं होतं. तिच्या आईला 23 व्या वर्षीच तीन अपत्ये झाली होती.  

2) भारतीचे वडील ती 2 वर्षांची असतानाच वारले होते. त्यानंतर तिच्या आईने दुसरं लग्न केलं नाही. जे मिळेत ते काम करुन आई आणि मोठा भाऊ पोट भरण्यासाठी धडपड करत होते. 

3) भारतीच्या भावाचं अमृतसरमध्ये जनरल स्टोर आहे. तर तिची मोठी बहीण पिंकी राजपूत ही सुद्धा अमृतसरमध्ये सेटल झाली आहे. 

4) भारती ही 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'ची सेंकड रनरअप होती. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिने नंतर एकापेक्षा एक कॉमेडी शो मधून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करतीये. महत्वाची बाब म्हणजे समोर मोठमोठो कॉमेडियन असून सुद्धा भारती त्यांच्या समोर जराही कमी पडत नाही.

5) भारती शाळेत असताना तिला पिस्टल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं. भारतीला रायफल शूटर व्हायचं होतं, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. भारतीने कॉलेजमध्ये असताना नॅशनल आणि स्टेट लेव्हल कॉम्पिटिशनमध्ये पंजाबचं प्रतिनिधीत्व केलंय. नंतर तिने कॉलेज सोडल्यावर याही गोष्टी मागे पडल्या.

6) एक काळ असा होता की, भारतीला पुढे शिकायचं होतं. पण कॉलेजचा खर्च उचलण्यासाठी तिच्याकडे पैसे नसायचे. पंजाबसाठी तिने अनेक मेडल्स जिंकले त्यामुळे तिचं शिक्षण पूर्ण होऊ शकलं. भारतीने पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून इतिहासातून एमए केलंय.

7) भारतीने एकदा सांगितले होते की, तिचा जन्म झाला तेव्हा तिचं वजन 5 किलोच्या जवळपास होतं. नंतर शाळेत असताना सर्वासारखे तिलाही इतर लोक जाडी म्हणून चिडवत होते. 

8) भारती ही आर्थिक अडचणीमुळे अभिनय क्षेत्रात आली. त्यासाठी तिने मुंबई गाठली पण नातेवाईकांनीच आधी नाके मुरडली होती. भारतीला स्टेजवर बघून नातेवाईक हसायचे, तिची खिल्ली उडवायचे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारभारती सिंग