Join us

"त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दुःख दडलेलं...", गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोकण हार्टेड गर्ल हळहळली, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 18:51 IST

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर मन सुन्न पोस्ट शेअर केली आहे.

Ankita Walawalkar: गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्व दिले गेले आहे. आजचा दिवस म्हणजे गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. अनेकजण या दिवशी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून त्यांच्या गुरुंविषयी प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर मन सुन्न पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलंय.

नुकतीच अंकिता वालावलकरने तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पोस्ट लिहून शेअर केली आहे. तिची पोस्ट पाहून चाहते देखील हळहळले आहेत. ज्यांनी शिक्षणाचे धडे त्या गुरुंबद्दल मन हेलावून टाकणारी पोस्ट तिने लिहिली आहे. त्यामध्ये अंकिताने म्हटलंय,"एका वर्षाने समजलं... की आमचे सक्नु सर आपल्यात नाहीत. त्यांनी suicide केल. मनावर मोठा आघात झाला, कारण आठवणही तेव्हा आली... जेव्हा ती व्यक्ती कायमची हरवली. आपण आयुष्यात इतके व्यस्त होतो की शिक्षकांचं अस्तित्व फक्त गुरुपौर्णिमेपुरतं मर्यादित झालंय. त्यांचं माणूसपण, त्यांची वेदना, त्यांचा संघर्ष... आपण लक्षात घेतलाच नाही. आज मन सुन्न आहे. त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दुःख दडलेलं होतं, आपल्यापैकी कुणालाच कळालं नाही... की कळवून घेतलं नाही?"

त्यानंतर अंकिताने लिहिलंय, "आपण वेळेत एक फोन केला असता, एक भेट दिली असती, तर कदाचित आजचा दिवस वेगळा असता. सर, तुमचं शिकवणं, तुमचा आवाज, तुमचं प्रोत्साहन... अजूनही मनात जपून ठेवलंय. माफ करा सर... उशिरा आठवण काढली पण मनापासून. तुमच्या आत्म्यास शांती लाभो." अंकिता वालावलकरच्या पोस्टने चाहत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. 

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरटिव्ही कलाकारगुरु पौर्णिमासोशल मीडिया