Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजपाल यादवने तिहार जेलमध्ये केलं आत्मसमर्पण, मदतीसाठी पुढे आला 'हा' टीव्ही अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:01 IST

सोनू सूदनेही केली मदतीची घोषणा

हिंदी सिनेमांमध्ये आपल्या भूमिकांनी खळखळून हसवणारे अभिनेता राजपाल यादव अडचणीत आहे. एका सिनेमासाठी त्याने कर्ज घेतलं होतं. सिनेमाची कमाई कमी झाल्याने त्याला फटका बसला. नंतर चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी राजपाल यादवला अनेकदा कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस मिळाली होती. अखेर दोन दिवसांपूर्वीच त्याने दिल्लीतील तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केलं. राजपालला  अशा प्रकारे अडचणीत पाहून अनेक सेलिब्रिटी त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सोनू सूद राजपालला मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. तर आता टीव्ही अभिनेता गुरमीत चौधरीनेही मदतीसाठी तयारी दर्शवली आहे. त्याने सविस्तर ट्वीटही केलं आहे.

गुरमीत चौधरीने ट्वीट करत लिहिले, "राजपाल यादव सारख्या वरिष्ठ आणि प्रतिभावान कलाकाराला अशा अडचणींचा सामना करताना पाहून माझं मन तुटत आहे. त्यांनी आपल्याला खळखळून हसवलं आणि कित्येक अविस्मरणीय भूमिका दिल्या. आज त्यांना आपली गरज आहे. एक सह कलाकार आणि एक माणूस म्हणून मी त्यांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी पुढे येत आहे."

मी सिनेजगतातील सर्व निर्माते, दिग्दर्शक आणि सदस्यांनाही नम्र विनंती करतो की आपण सर्व करुणा आणि माणुसकी दाखवून या अडचणीतून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करु. आपली इंडस्ट्री म्हणजे एक कुटुंब आहे आणि कुटुंबातील सदस्य कधीच एकमेकांना एकटं सोडत नाहीत."

नक्की प्रकरण काय?

राजपाल यादव आणि पत्नी राधा यादव यांनी २०१० साली 'अता पता लापता' सिनेमासाठी ५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. मात्र रिटर्न्स न मिळाल्याने कर्जाचे पैसे वाढून ९ कोटी झाले. कर्ज फेडणारे चेक सतत बाऊन्स व्हायला लागले तेव्हा राजपाल यादवविरोधात कायदेशीर कारवाई सुरु झाली. नुकतंच कोर्टाने त्याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली. याला राजपालने आव्हान दिलं. अनेक वर्ष त्याने शिक्षा पुढे ढकलली. शेवटी यावर्षी ४ फेब्रुवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने मुदत वाढवण्यास नकार दिला आणि शिक्षआ सुनावली.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajpal Yadav Surrenders in Tihar; TV Actor Offers Help

Web Summary : Rajpal Yadav surrendered in Tihar Jail over a loan repayment issue. Facing hardship, he's receiving support from celebrities. Gurmeet Choudhary has publicly offered assistance to Yadav.
टॅग्स :राजपाल यादवगुरमीत चौधरीबॉलिवूडटिव्ही कलाकार