Join us

धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 11:09 IST

अभिनेत्रीच्या मुलाने बिल्डिंगच्या ५७व्या मजल्यावरुन उडी मारत जीवन संपवलं आहे. बुधवारी(२ जुलै) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

सिनेसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक लेकाने बिल्डिंगवरुन उडी मारत जीवन संपवलं आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीच्या मुलाने बिल्डिंगच्या ५७व्या मजल्यावरुन उडी मारत जीवन संपवलं आहे. बुधवारी(२ जुलै) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्याआधी अभिनेत्री आणि तिच्या मुलामध्ये ट्युशन क्लासला जाण्यावरुन वाद झाला होता. यातूनच मुलाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजत आहे. टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी गुजराती अभिनेत्री मुंबईतील कांदिवली परिसरातील सी-ब्रुक या कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. बुधवारी संध्याकाळी तिने मुलाला ट्युशन क्लासला जाण्यास सांगितलं. मात्र मुलाला क्लासला जायचं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात मुलाने बिल्डिंगच्या शेवटच्या मजल्यावर जात तिथून उडी मारली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. तो केवळ १४ वर्षांचा होता. 

याप्रकरणी पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आईसोबत झालेल्या वादातूनच मुलाने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  एकलुत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमृत्यू