रातोरात नॅशनल क्रश झालेली गिरिजा ओक सध्या चर्चेत आहे. गिरिजा ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. अनेक जाहिराती, मालिका आणि सिनेमांमध्येही ती झळकली आहे. गिरिजा ही प्रसिद्ध अभिनेते गिरिष ओक यांची मुलगी आहे. गिरिष ओक यांनी पद्मश्री पाठक यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच गिरिजा आईवडिलांच्या घटस्फोटाबाबत बोलली आहे.
गिरिजाने नुकतीच 'हॉटरफ्लाय' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत गिरिजाने आईवडिलांचा घटस्फोट आणि त्यानंतर तिला घ्याव्या लागलेल्या थेरेपीबाबत भाष्य केलं. गिरिजा म्हणाली, "माझ्या आईवडिलांमध्ये मतभेद होते. या गोष्टी मला माहीत होत्या. हळूहळू या गोष्टी वाढत गेल्या. त्यानंतर त्यांनी मग वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आम्ही रोज यातून जात होतो. आणि आमचं बाकीचं आयुष्यही जगत होतो. तेव्हा मला काय होतेय हे कळत नव्हतं. मला पॅनिक अटॅक यायचे. मला प्रचंड घाम यायचा. मला कसंतरीच फिल व्हायचं. आणि हे कुठेही व्हायचं. म्हणजे मी कॉलेजला जाताना किंवा मी लॅबमध्ये असताना... म्हणजे मी करत असलेल्या गोष्टींचं मला टेन्शन नव्हतं. पण, इतक्या वर्षांपासून मी जो तणाव घेतला होता त्याला माझं शरीर अशा पद्धतीने प्रतिक्रिया देत होतं. पण, हा तणाव आहे हेदेखील मला माहीत नव्हतं".
"मला वाटलेलं की माझ्या शरीरात काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा मला काहीतरी होतंय. मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की मला काहीतरी होतंय पण मला कळत नाहीये की काय होतंय. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला कोणाशी तरी बोलायची गरज आहे. तेव्हा मग मी थेरेपी आणि मेडिकेशन सुरू केलं. आईवडिलांच्या घटस्फोटाबद्दल मी कुणाशीच काहीच बोलले नव्हते. कारण, काय बोलू हेच मला कळत नव्हतं. एका घटस्फोटित आईवडिलांची मुलगी असल्याचं ओझं घेऊन मी जगते. जेव्हा मी छोटी होते...जेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा मी हाच विचार करायचे की मी माझं लग्न टिकवून दाखवेन. हे प्रेशर मी स्वत:हून घेतलं होतं. पण, मी त्याच दृष्टिकोनातून रिलेशनशिपकडे बघायचे. सुदैवाने मी अशा माणसाशी लग्न केलंय जो माझा खूप चांगला मित्र आहे", असंही गिरिजा पुढे म्हणाली.
Web Summary : Girija Oak discussed her parents' divorce, revealing she experienced panic attacks. She sought therapy to cope with the emotional stress and societal pressure of being a child of divorced parents, impacting her views on relationships.
Web Summary : गिरिजा ओक ने माता-पिता के तलाक पर खुलकर बात की और बताया कि उन्हें पैनिक अटैक आते थे। तलाकशुदा माता-पिता की संतान होने के भावनात्मक तनाव से निपटने के लिए उन्होंने थेरेपी ली, जिससे रिश्तों पर उनका नजरिया प्रभावित हुआ।