Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला काहीच फरक पडत नाही...", राधा पाटीलला गौतमीचं जशास तसं उत्तर, म्हणाली- "माझ्याबाबतीत कोणीही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 17:56 IST

बिग बॉस मराठीच्या मंचावर राधाने गौतमी पाटीलला डिवचलं होतं. आता राधाला गौतमी पाटील हिने उत्तर दिलं आहे. 

कातिलों की कातिल राधा पाटील हिने बिग बॉस मराठी ६च्या घरात एन्ट्री घेतली होती. बिग बॉस मराठीच्या मंचावर राधाने गौतमी पाटीलला डिवचलं होतं. "मी खूप लोकांना पळवून लावलंय. जे काय महाराष्ट्रामध्ये एखादं नाव इकडे तिकडे गाजतंय त्यांना तर मी खूप आधीच पळवून लावलंय. आणि मी माझ्या टॅलेंटनुसार कोणाला घाबरत नाही. स्टेजवर समोर कोणीही आलं तरीही मी घाबरत नाही. मग ती गौतमी पाटील असो की कोणीही असो मी नाय घाबरत", असं राधा म्हणाली होती. आता राधाला गौतमी पाटील हिने उत्तर दिलं आहे. 

गौतमी पाटीलने अभिजात मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "राधा पाटीलचं माझ्यावर खूप प्रेम आहे. खूप जास्त प्रेम आहे. असू दे चांगली गोष्ट आहे. मी नेहमी सांगते की माझ्याबाबतीत कोणी बोललं तरी मला फरक पडत नाही. आणि मी पडू देतही नाही. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं हा माझा मंत्र आहे. म्हणून मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही. जाऊ दे ती पण आपलीच आहे. एवढं काय आहे की माझं नाव घ्यायचं आणि काहीही बोलायचं. ठीक आहे बोलू दे...माझ्यावर प्रेम आहे. मी उत्तर द्यायची गरजच लागत नाही. मी उत्तर देण्याआधीच माझ्यावर प्रेम करणारे लोक कमेंटमध्ये उत्तर देतात. याचा मला जास्त अभिमान वाटतो". 

दरम्यान, राधा पाटीलचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास दोन आठवड्यातच संपला. दुसऱ्या आठवड्यात तिने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. तिने बिग बॉसच्या घरात वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले होते. एक्स बॉयफ्रेंडबाबतही राधा पाटील बिग बॉसच्या घरात बोलली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gautami Patil's sharp reply to Radha Patil: 'I don't care.'

Web Summary : Gautami Patil responded to Radha Patil's comments, stating she's unbothered by what others say about her. She focuses on positivity and appreciates her fans' support. Radha was recently evicted from Bigg Boss Marathi.
टॅग्स :गौतमी पाटीलबिग बॉस मराठी ६टिव्ही कलाकार