Gautami Patil: लोकप्रिय नृत्यांगना आणि सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. सबसे कातिल गौतमी पाटील... म्हणून ती चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. गौतमीच्या शोसाठी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र, सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येणाऱ्या गौतमीसाठी हा प्रवास सोपा नव्हता. गौतमीने खऱ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. गौतमीच्या जन्माचं आधीच आई व वडील वेगळे झाले होते. त्यामुळे तिच्या आईने एकल पालकत्व स्विकारत सांभाळ केला. त्यात आता अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत गौतमीच्या तिच्या वडिलांविषयी सांगितलं आहे.
गौतमीचे वडील या जगात नाहीत. ते धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते. गौतमीचे वडील वडील रवींद्र पाटील यांची परिस्थिती खालावली होती. या स्थितीत गौतमीने त्यांना साथ दिली त्यांचे उपचार केले. अलिकडेच 'अभिजात मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत गौतमी म्हणाली, माझ्या आजोबांकडून मला बाबांचं प्रेम मिळालं. मी लहानपणापासूनच आजोबांकडे राहिले. माझ्या आईने आणि आजोबांनीच मला सांभाळलं. शाळा असो किंवा इतर काही गोष्टी ती वस्तू त्यांनी मला पुरवली. म्हणजे जिथे वडील पाहिजे होते. तिथे वडील आले. "
त्यानंतर शाळेतील त्या आठवणी सांगत म्हणाली, "शाळेत असताना माझ्या मैत्रीणी आणि त्यांच्या वडिलांना पाहून प्रत्येकवेळी बाबांची आठवण यायची. मग मी आईला बाबा कुठे आहात... ते काय करतात. असे प्रश्न विचारायचे पण आई त्यावर उत्तर देणं टाळायची. तेव्हा तिलाही त्रास झाला असावा. तेव्हा मी लहान होते, मला काहीच कळायचं नाही. पण, आता मी त्यावर बोलायचं टाळते. त्यावेळी माझ्या आईने देखील संयमाने सगळं हाताळलं आणि माझं संगोपन केलं. तिने प्रत्येकवेळी माझा विचार केला. "
त्यांना शेवटच्या क्षणी भेटले,पण...
"वडील मला कधी भेटायला आलेच नाहीत. आपली मुलगी आहे तर तिला भेटावं? तिच्याकडे जावं का? असा कधी त्यांना विचार आला नसेल का? असं मला वाटतं. तेवढी एक खंत मनात आहे. पण, ज्यावेळी त्याचं निधन झालं तो क्षण देखील माझ्यासाठी कठीण होता. मी त्यांना शेवटच्या क्षणी भेटले. आम्ही त्याआधी सुद्धा भेटलो होतो. त्यांना आणि माझ्या आईला एकत्र आणायचं, असा आम्ही विचार केला होता. पण दुर्दैवाने ते या जगात राहिले नाही. शेवटच्या क्षणी तरी ते मला भेटले निदान याचा आनंद आहे."
Web Summary : Dancer Gautami Patil tearfully recounted her difficult childhood, raised by a single mother and grandparents after her parents separated. She met her father before he passed away, cherishing that final encounter despite their strained relationship.
Web Summary : नृत्यांगना गौतमी पाटिल ने अपने मुश्किल बचपन को याद किया, माता-पिता के अलग होने के बाद एक माँ और दादा-दादी ने उनका पालन-पोषण किया। उन्होंने अपने पिता के निधन से पहले उनसे मुलाकात की, और तनावपूर्ण रिश्ते के बावजूद उस अंतिम मुलाकात को संजोया।