Join us
Daily Top 2Weekly Top 5

साक्षी-रामचा मालिकेत इंटिमेट सीन, नुकतीच आई झालेली गौतमी गाडगीळ; नवऱ्याला म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:09 IST

हा सीन शूट केल्यानंतर रात्री अडीच वाजता रामने पत्नी गौतमीला फोन केल्यावर. रामने सर्व सांगितलं. त्यानंतर गौतमीने काय केलं?

टीव्ही विश्व ज्या जोड्यांनी गाजवलं त्यापैकी एक जोडी म्हणजे राम कपूर आणि साक्षी तन्वर. या दोघांची भूमिका असलेल्या 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिकलं. मात्र, या मालिकेतील एका इंटीमेट सीनमुळे त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. छोट्या पडद्यावर अशा प्रकारचा बोल्ड सीन दाखवणे ही त्या काळी खूप मोठी आणि धाडसी गोष्ट मानली जात होती. आता इतक्या वर्षांनंतर राम कपूरची पत्नी आणि अभिनेत्री गौतमी गाडगीळ-कपूर हिने या सीनवर तिची प्रतिक्रिया काय होती, याबद्दलचा खुलासा केला आहे.

हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने सांगितले की, ज्यावेळी हा सीन शूट झाला, त्यानंतर रामने तिला फोन केला होता. गौतमी म्हणाली, "मला रात्री अडीच-तीनच्या सुमारास रामचा फोन आला. त्यावेळी आमचे बाळ लहान होते आणि मी त्याला दूध पाजत होते. फोनवर रामने मला सांगितले की, 'बघ, आज असं असं शूट झालं आहे...' हे ऐकल्यावर माझी प्रतिक्रिया खूप विचित्र होती. मी काहीही न बोलता लगेच फोन कट केला. मला त्याबद्दल त्यावेळी काहीही विचार करायचा नव्हता."

गौतमीने पुढे सांगितले की, फोन कट केल्यानंतर तिने शांतपणे विचार केला. तिला जाणीव झाली की ते दोघेही कलाकार आहेत आणि फक्त त्यांचे काम करत आहेत. "टीव्ही सेट ही अशी जागा आहे जिथे खऱ्या अर्थाने रोमान्ससाठी जागा नसते, तिथे फक्त तांत्रिक गोष्टी आणि कामाचा दबाव असतो," असे तिला वाटले. राम त्या काळात खूप मेहनत घेत होता, कधी कधी सलग ४८ तास शूटिंग करत असे. अशा परिस्थितीत त्याला आणखी त्रास का द्यायचा, असा विचार करून तिने स्वत:ला सावरले.

 जेव्हा राम कपूर सकाळी शूटिंग संपवून घरी पोहोचला, तेव्हा गौतमीने त्याच्याशी कोणतेही भांडण केले नाही किंवा कोणतीही तक्रार केली नाही. तिने त्याला फक्त प्रेमाने मिठी मारली आणि पाठिंबा दिला. काही काळापूर्वी राम कपूरनेही एका मुलाखतीत या सीनबद्दल सांगितले होते. त्याने स्पष्ट केले की, हा सीन खुद्द निर्माती एकता कपूरने लिहिला होता. रामचा या सीनला सुरुवातीला विरोध होता, पण मालिकेच्या कथेची गरज म्हणून आणि निर्मात्यांच्या आग्रहाखातर त्याने तो सीन पूर्ण केला होता. हा सीन भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात गाजलेल्या दृश्यांपैकी एक ठरला होता, ज्याने मालिका विश्वात मोठी खळबळ उडवून दिली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Sakshi-Ram's intimate scene: Gautami Gadgil's reaction after becoming a mother.

Web Summary : Gautami Gadgil revealed her reaction to Ram Kapoor's intimate scene with Sakshi Tanwar. She received a late-night call from Ram and initially hung up, but later understood it was part of his job. She supported him, recognizing the demanding nature of television work.
टॅग्स :राम कपूरटेलिव्हिजनदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टलग्नटिव्ही कलाकार