Join us

कोळीवाड्याची थीम अन्...; मराठी अभिनेत्याच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष, पहिल्यादांच दाखवली लेकाचीही झलक, व्हिडीओ बघाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:29 IST

मराठी अभिनेत्याच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष, पहिल्यादांच दाखवली लेकाचीही झलक, व्हिडीओ बघाच 

Abhijeet Shwetchandra video : ज्या सणाची वर्षभर सगळेच मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात, तो दिवस अखेर उजाडला. काल २७ ऑगस्ट रोजी देशभरात  लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झाले असून, घरभर आनंदाचं वातावरण पसरलं आहे. अभिजीतसाठी यंदाचा गणेशोत्सव अगदीच खास आहे, याचं कारण म्हणजे अभिनेता त्याच्या लाडक्या लेकासोबत हा सण साजरा करतो आहे. याच निमित्ताने अभिजीतने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. 

'शुभविवाह','नवे लक्ष्य,आणि 'आई तुळजाभवानी'मालिकेतून अभिजीत श्वेतचंद्र घराघराच पोहोचला. अशातच गणेशोत्सवानिमित्ताने नुकताच अभिजीत श्वेतचंद्रने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. यंदा अभिनेत्याने बाप्पाासाठी साकारलेल्या भव्य देखाव्याचं देखील कौतुक होत आहे. कोळीवाड्याची थीम असलेला साजेसा देखावा त्याने घरी साकारून त्यासाठी बोट, टोपल्या बनवल्या या थीमला मॅच होणारं डिझाईन तयार केलं आहे. याचदरम्यान, अभिजीत श्वेतचंद्रने  सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबीयांबरोबरचा खास व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये  पारंपरिक कोळी वेशभूषेत त्याच्या घरातील प्रत्येकजण तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. 

दरम्यान, लेकाच्या जन्मानंतर  पहिल्यांदाच अभिनेत्याच्या घरी बाप्पा विराजमान झाले असल्याने त्यामुळे यंदाच्या थीमला साजेसा लूक त्यांनी केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीतने त्याच्या लेकाची पहिल्यांदाच झलक दाखवली आहे. त्याचबरोबर व्हिडीओमध्ये श्वेतचंद्र कुटुंबीय पारंपरिक कोळी गीतावर डान्स देखील करताना दिसत आहेत. गणरायाच्या आगमनाने त्याच्या घरात सगळेच आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीगणेश चतुर्थीसोशल मीडिया