Join us
Daily Top 2Weekly Top 5

या गंभीर आजाराशी लढतेय 'फुलाला सुंगध मातीचा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली-मी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 20:12 IST

दिवसांपूर्वीच तिने आपल्या आजारपणाचे गांभीर्य सर्वांसमोर मांडले. या आजारामुळे ठराविक असह्य वेदना होतात त्यामुळे तिला रात्रीची झोप लागत नाही.

स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sunghandh Maticha Serial) ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. किर्ती आयपीएस अधिकारी झाली आहे .जामखेडकर कुटुंबीयांनी तिचं मोठं थाटामाटात स्वागत केलं आहे. आता या मालिकेतील कविता संदर्भातील एक माहिती समोर येतेय.

फुलाला सुंगध मातीचा या मालिकेत कविताची भूमिका अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे साकारतेय. सोशल मीडियाच्या माध्यमातून भाग्यश्रीने आपल्या आजारपणाबाबत खुलासा केला आहे. या आजारामुळे तिने काही काळा मालिकेतून ब्रेक घेतला आहे.काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीने आपल्या आजारपणाचे गांभीर्य सर्वांसमोर मांडले. एमआरआय काढल्यानंतर तिला पेन्सोमनिया या आजाराचे निदान झाले होते. या आजारामुळे ठराविक असह्य वेदना होतात त्यामुळे तिला रात्रीची झोप लागत नाही. नुकतीच भाग्यश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आयुष्य या लाटां सारख खवळय तरीही मी पाय रोवून उभी आहे तुमच्या सगळ्याच्या प्रेमामुळे.. या पोस्टमधून भाग्यश्रीने चाहत्यांची लवकर बरं होण्यासाठी दिलेल्या शुभेच्छांबाबत आभार मानलेत. 

 कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेत भाग्यश्रीने रमाची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे भाग्यश्री घराघरात पोहोचली.स्त्रीलिंगी पुल्लिंग या वेबसीरीजमध्ये ती महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. पुढे तान्हाजी या बॉलिवूड चित्रपटात भाग्यश्रीला सूर्याजींच्या पत्नीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

टॅग्स :टिव्ही कलाकार