Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच रितेशभाऊ घरात येऊन सर्वांना देणार सरप्राइज, कुटुंबाचे व्हिडीओ पाहून सदस्य भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 09:00 IST

बिग बॉस मराठीच्या घरात आज रितेश देशमुख पहिल्यांदाच जाणार असून सर्वांना एक खास सरप्राइज देणार आहे (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन गोष्टी बघायला मिळतात. बिग बॉसचा खेळ सुरु होऊन आता आठ आठवडे झाले आहेत. या आठवड्यात अनेक राडे, वादविवाद, भांडणतंटे बघायला मिळाले. रितेश देशमुख त्याच्या वेगळ्या शैलीत बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करतोय. निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, पॅडी कांबळे असे अनेक स्पर्धक घर गाजवताना दिसत आहेत. अशातच आज रविवारी रितेश देशमुख त्याचा भाऊचा धक्का थेट बिग बॉसच्या घरात भरवणार आहे.

रितेश देशमुख पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत बघायला मिळतं की, रितेश देशमुखची पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात एन्ट्री होते. तो घरात येताच सर्वांच्या आनंदाला उधाण येतं. रितेश देशमुख घरातील सर्वांना त्यांच्या कुटुंबाचे व्हिडीओ दाखवतो. यावेळी जान्हवीचा मुलगा इशान आईसाठी खास शुभेच्छा देतो. DP चे कुटुंंबिय सुद्धा त्याच्यासाठी खास व्हिडीओ पाठवतात. अभिजीत सावंतची मुलगी लाडक्या बाबाला शुभेच्छा देतात. मुलांचे आणि कुटुंबाचे व्हिडीओ पाहताना सर्वच इमोशनल होतात.

आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलं

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये काल भाऊचा धक्का झाला. या धक्क्यावरुन मोठी बातमी समोर आली ती म्हणजे आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलं. टास्कदरम्यान निक्कीवर हात उगारल्याने आर्याला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखसमोर ही मोठी शिक्षा सुनावण्यात आलीय. आर्याला बिग बॉसने तत्काळ निष्कासीत केलंय. आर्याचा बिग बॉस मराठीमधील प्रवास संपला आहे. कोणालाच तिचा निरोप घेता आला नाही. मुख्य दरवाजातून आर्या घराबाहेर गेलीय.

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखकलर्स मराठी