Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांका त्रिपाठीला पती विवेक दहियाविषयीची पहिल्यांदा उघड केली 'ही' गोष्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 07:15 IST

मुळात अनेक गोष्टी आणि स्वभाव जुळून आल्यानंतर विवेक आणि दिव्यांकाने लग्नाचा विचार केला आणि चंदिगडमध्ये अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि नातलगांच्या उपस्थितीत त्यांनी साखरपुडा केला तर लग्न त्यांनी भोपाळ येथे केले होते.

नुकताच सुरू झालेला रिअलिटी शो ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात  प्रख्यात गायक हे प्रशिक्षक म्हणून तर महान संगीतकार ए. आर. रेहमान हे सुपरगुरू म्हणून झळकत आहेत. त्यामुळे या रिअलिटी शोला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. तर दुसरीकडे टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी पहिल्यांदा या शोचे सुत्रसंचालन करत आहे. नुकतेच तिने दिलेल्या मुलाखतीत  पती विवेक दहियाला गाणे गाता येत नाही याबाबत खंत व्यक्त केली आहे. 

मुळात अनेक गोष्टी आणि स्वभाव जुळून आल्यानंतर विवेक आणि दिव्यांकाने लग्नाचा विचार केला आणि चंदिगडमध्ये अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि नातलगांच्या उपस्थितीत त्यांनी साखरपुडा केला तर लग्न त्यांनी भोपाळ येथे केले होते. जुलै महिन्यात त्यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण होतील. तसेच दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया हे नवदाम्पत्य त्यांच्या चाहत्यांसह अनेकांसाठी एक आदर्श जोडपे आहे. तुझा पती कसा गातो, अशी विचारणा या कार्यक्रमात झाल्यावर दिव्यांकाने हसत हसत सांगितले, “माझा विवेक जेव्हा गायला लागतो, तेव्हाच मला फक्त आमच्या लग्नाचा पुनर्विचार करावासा वाटतो. गाणं सोडलं, तर तो इतर प्रत्येक बाबतीत एक आदर्श पती आहे.”

दिव्यांका त्रिपाठीला पती विवेक दाहियाने दिले असे सरप्राईज !

विवेक या स्टुडिओच्याच जवळपासच्या भागात चित्रीकरण करीत होता. त्यामुळे त्याने दिव्यांकाची भेट घेण्याचं ठरवून तो या कार्यक्रमाच्या सेटवर आला. त्याला अनपेक्षितपणे आलेला पाहून दिव्यांका जशी प्रफुल्लित झाली.  तिचं मनोबल वाढविण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी विवेक तिचं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत सेटवरच थांबला. 

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीविवेक दहिया