Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ये रिश्ता क्या कहलाता है’चा महा-एपिसोड पाहून संतापले चाहते; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 14:01 IST

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेचे दर्दी चाहते कार्तिक आणि नायरा यांना दूर जाताना पाहूच शकत नाहीत. असे काही झाले की, चाहत्यांचा संताप अनावर होतो.

ठळक मुद्देमालिकेतील नायरा व कार्तिकच्या ऑनस्क्रीन जोडीला चाहत्यांचे उदंड प्रेम मिळाले. ही जोडी सोशल मीडियावर कायरा नावाने प्रसिद्ध आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेचे दर्दी चाहते कार्तिक आणि नायरा यांना दूर जाताना पाहूच शकत नाहीत. असे काही झाले की, चाहत्यांचा संताप अनावर होतो. काल रात्री ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ चा महा-एपिसोड ऑनएअर केला गेला. या एपिसोडमध्ये बराच ड्रामा पाहायला मिळायला. सोबत कार्तिकमुळे वेदिका आणि नायरा पहिल्यांदा एकमेकींसमोर आल्याचेही दिसले. यादरम्यान कार्तिक वेदिकाला नायराची ‘माझी एक्स-वाईफ ’ओळख करून देतो. कारण कार्तिकचे लग्न आता वेदिकाशी झाले आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील हा सीन पाहून चाहते खवळले.

मोहसीन खान आणि शिवांगी जोशी अर्थात कार्तिक व नायराची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आवडणारे चाहते हा एपिसोड पचवू शकले नाहीत. मग काय, त्यांनी सोशल मीडियावर याबद्दलचा संताप व्यक्त केला. केवळ इतकेच नाही तर या मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसला श्रद्धांजली वाहत,  #RIPDirectorsKutProductions या टॅगचा वापर करत अनेक वाईट प्रतिक्रिया नोंदवल्या. काहीच क्षणात  #RIPDirectorsKutProductions सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला.

यापूर्वी याच मालिकेत नायरा आणि कार्तिकचा मुलगा कैरव याची भूमिका साकारणा-या बालकलाकाराला रिप्लेस करण्यात आले होते. यावरूनही चाहते संतापले होते. आम्हाला तोच जुना कैरव हवा, अशी मागणी चाहत्यांनी लावून धरली होती.

मालिकेतील नायरा व कार्तिकच्या ऑनस्क्रीन जोडीला चाहत्यांचे उदंड प्रेम मिळाले. ही जोडी सोशल मीडियावर कायरा नावाने प्रसिद्ध आहे. या जोडीच्या नावावर सोशल मीडियावर अनेक फॅन क्लबही आहेत. या फॅन क्लबवर मोहसिन खान व शिवांगी जोशीचे रोज नवे फोटो शेअर होत असतात.

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता है