Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस १७' जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीला पाहण्यासाठी डोंगरीत चाहत्यांची तुफान गर्दी, दणक्यात केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 18:56 IST

डोंगरी का शेर...!! 'बिग बॉस १७' जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची झुंबड, केला जल्लोष

'बिग बॉस १७'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. कॉमेडियन मुनव्वर फारुकी 'बिग बॉसच्या १७'व्या पर्वाचा विजेता ठरला. सर्वाधिक मतं मिळवत मुनव्वरने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. 'बिग बॉस १७'चा विजेता ठरल्यानंतर मुनव्वर ट्रॉफी घेऊन मुंबईतील डोंगरी येथे त्याच्या निवासस्थानी गेला. 'बिग बॉस' विजेता असलेल्या मुनव्वरचं स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. 

'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर मुनव्वरची लोकप्रियता वाढली आहे. मुनव्वरने 'बिग बॉस' जिंकल्यानंतर डोंगरीत त्याचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन मुनव्वरचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत 'बिग बॉस' विजेत्या मुनव्वरला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचं दिसत आहे. मुनव्वर हातात 'बिग बॉस'ची ट्रॉफी घेऊन चाहत्यांना दाखवत असल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून जिकडेतिकडे मुनव्वरची क्रेझ असल्याचं दिसत आहे. 

कॉमेडियन मुनव्वर फारुकीने पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'च्या घरात त्याचं स्थान पक्क करण्यास सुरुवात केली होती. 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी तो एक होता. 'बिग बॉस'चं विजेतेपद मिळवल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफीबरोबरच ५० लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेटा ही कार बक्षीस म्हणून मिळाली आहे. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार