Join us

चाहते हैराण, बिग बॉस 17′ मधून 5 स्पर्धक होणार बेघर? मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 18:29 IST

बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक असणारा कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस १७'.  बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. बिग बॉस 17 मध्ये मोठा हंगामा होतोय.  गेममध्ये एकामागून एक ट्विस्ट घेऊन येत आहेत.  पाच जणांना घरातून बाहेर काढले जाऊ शकते आणि शोमध्ये मोठा बदल होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. 

बिग बॉसचे अपडेट देणाऱ्या एका पेजने अलीकडेच सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. सध्या मेकर्सना कुठलाही कंटेंट मिळत नसल्याने पुढच्या आठवड्यात बिग बॉसमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. पुढील एपिसोड प्रसारित झाल्यानंतरच सत्य काय ते समोर येईल. 

बिग बॉस सीझन 17 मधील पाच स्पर्धकांना बाहेर काढल्यानंतर काही वाईल्ड कार्ड एन्ट्री होऊ शकतात. हा सीझन यशस्वी करण्यासाठी निर्माते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परंतु आतापर्यंत हा शो टॉप 3 मध्ये स्थान मिळवू शकला नाही. यंदा बिग बॉस दिल, दिमाग आणि दम या तीन घरांमध्ये विभागले गेले आहे. निर्मात्यांनी बिग बॉस सीझन १७ मध्ये ड्रामा वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार