Join us

‘देवमाणूस’मधील टोण्याची आई खऱ्या आयुष्यात कशी दिसते बघा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 17:57 IST

Devmanus : मंगल बद्दल काही गोष्टी... अंजली जोगळेकर ही ‘देवमाणूस’ मालिकेत अगदी टिपिकल आई बनलीये. पण रिअल लाईफमध्ये ती चांगलीच ग्लॅमरस आहे.

ठळक मुद्देअनेक चित्रपटांतही अंजलीने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्रिज्या, गॅट मॅट या सिनेमात ती झळकलीये.

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus) या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. मालिकेच्या रहस्यमयी आणि थरारक कथानकाने प्रेक्षकांवर जादू केली आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखाही चाहत्यांच्या पसंतीत उतरल्या आहे. देवीसिंग, एसीपी दिव्या, डिंपी, टोण्या, टोण्याची आजी ही पात्र कमालीची लोकप्रिय झाली आहेत. आज आम्ही या मालिकेतील अशाच एका लोकप्रिय व्यक्तिरेखेबद्दल सांगणार आहोत. ती कोण तर मंगलच्या. होय, टोण्या व डिंपीची आई मंगल हिची व्यक्तिरेखा अभिनेत्री अंजली जोगळेकर (Anjali Joglekar) हिने साकारली आहे.

अंजली जोगळेकर ही ‘देवमाणूस’ मालिकेत अगदी टिपिकल आई बनलीये. पण रिअल लाईफमध्ये ती चांगलीच ग्लॅमरस आहे. शॉर्टफिल्म्स प्रेमींसाठी अंजलीचे नाव नवीन नाही. तिने अनेक प्रसिद्ध  शॉर्ट फिल्म्समध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘काव काव’ या शॉर्ट फिल्ममध्ये तिने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. वंदना, सावित्री, दिवली नाही विझता कामा, फिंगरप्रिंट, सिलवट या शॉर्ट फिल्म्समध्येही ती झळकली आहे. ‘सिलवट’ला तर अनेक पुरस्कार आणि नामांकनं मिळाली आहेत. 

अनेक चित्रपटांतही अंजलीने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्रिज्या, गॅट मॅट या सिनेमात ती झळकलीये. एका बँकेच्या जाहिरातीत अंजलीला सचिन तेंडुलकरसोबत काम करण्याची संधी मिळाली होती.

सध्या त्या देव माणूस या मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. वेळोवेळी शूटिंगच्या मधल्या वेळेतील बिहाइंड द सीन्स फोटोज त्या अपलोड करत असतात. तसेच मध्ये मध्ये इतर कलाकारांसोबत त्या गंमती जंमतींमध्ये सहभागी होत असतात. त्यांच्या आत्तापर्यंतच्या कलाप्रवासा प्रमाणेच या पुढच्या काळातही त्यांच्या विविध भूमिका, विविध माध्यमांतून आपल्याला भेटीस येत राहतील हे नक्की.   

टॅग्स :झी मराठीटेलिव्हिजन