Join us

EXCLUSIVE : झी मराठीवरील 'ही' प्रसिद्ध मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:06 IST

झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर (Zee Marathi) अलीकडेच अनेक मालिका सुरू आहेत.

झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर (Zee Marathi) अलीकडेच अनेक मालिका सुरू आहेत. पण मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. झी मराठी वाहिनीने नुकतीच त्यांच्या सोशल मिडियावरुन नव्या मालिकेची घोषणा केली. तू तेव्हा तशी असं नावाच्या मालिकेचं टिझर  रिलीज झाला आणि यात दिसून आले ते अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर.

नवी मालिका येणार म्हटलं की तीची वेळ काय असेल, कोणत्या मालिकेच्या जागी ही मालिका येईल अर्थात कोणती मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असे एक ना अनेक प्रश्न पडतात.  

लोकमतच्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार ओम आणि स्विटूची येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. ​या जागी स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका तु तेव्हा तशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

याआधी हार्दिक जोशी आणि अमृता पवार यांची तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका बंद होणार अशी चर्चा होती मात्र ही मालिका सुरुच राहणार असल्याचं लोकमत फिल्मीच्या सुत्रांना कळालं आहे. सिद आणि अदिती यांच लग्न झाल्यावर मालिकेला चांगला टीआरपी नसल्याने सहा महिन्यात ही मालिका बंद होणार असल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. 

टॅग्स :झी मराठीटिव्ही कलाकार