Join us
Daily Top 2Weekly Top 5

'क्वीन'मधील कंगनाच्या भूमिकेवरून एरिकाने घेतली प्रेरणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 14:18 IST

अनुरागच्या विश्वासघातामुळे हृदयभंग झालेली प्रेरणा या अन्यायाविरोधात ठाम उभे राहण्याचा निश्चय करून अनुरागच्या घरात प्रवेश करते.

‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील प्रेरणा शर्माच्या भूमिकेमुळे एरिका फर्नांडिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही भूमिका ती ज्या प्रकारे साकारत आहे, ते पाहून तिच्या चाहत्यांमध्ये वाढच होत आहे. या मालिकेच्या कथानकाला मिळालेल्या एका अनपेक्षित वळणात प्रेक्षकांनी पाहिले की अनुरागने आपल्या प्रेमाचा त्याग करीत कोमोलिकाशी विवाह केला. त्याच्या या कृतीने प्रेरणाचे जीवनात उलथापालथ झाली असून तिचा प्रेमभंग झाला आहे. पण ती आता या विरोधात ठामपणे सामोरं जाण्याचे ठरवते आणि या घरातील पहिली सून म्हणून आपला अधिकार  गाजवण्याचा निर्णय घेते. त्यासाठी ती आपला संपूर्ण कायापालट करते आणि सौ. बसू म्हणून अनुरागला सामोरी जाते. पण आपल्या भूमिकेचा हा नवा अवतार साकारण्यासाठी कंगना राणौतच्या सार्वत्रिक प्रशंसापात्र ठरलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील भूमिकेवरून प्रेरणा घेतल्याचे एरिकाने मान्य केले आहे.

या अभिनेत्रीशी निकटचे संबंध असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, “अनुरागच्या विवाहानंतर एका स्वच्छंदी आणि आनंदी प्रेरणाचं रुपांतर एका निश्चयी आणि कणखर महिलेत होतं. अनुरागच्या विश्वासघातामुळे हृदयभंग झालेली प्रेरणा या अन्यायाविरोधात ठाम उभे राहण्याचा निश्चय करून अनुरागच्या घरात प्रवेश करते. प्रेरणाच्या स्वभावातील हा बदल टिपण्यासाठी एरिकाने कंगना राणावतच्या क्वीन चित्रपटातील भूमिकेवरून प्रेरणा घेतली आहे.

चित्रपटात  कंगणाचाही असाच विश्वासघात होतो तेव्हा ती पूर्वीची आपली सा-या गोष्टी बाजूला सारत कणखर महिला बनते. आता प्रेरणाचा बदललेला स्वभाव अचूकपणे व्यक्त करण्यासाठी एरिकाने हा चित्रपट अतिशय बारकाईने पाहिला असून कंगनाची देहबोली आणि वर्तनतील फरक तिने समजावून घेतला. 

तिच्या मते कंगणा आणि प्रेरणाच्या व्यक्तिरेखेत बरंच साम्य असून दोघींनाही विश्वासघात आणि प्रेमभंगाचं दु:ख अनुभवावं लागलं आणि शेवटी दोघीही कणखर महिला बनतात.” ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील प्रेरणा शर्माच्या व्यक्तिरेखेतील हा बदल पाहणे रसिकांना निश्चितच रंजक ठरणार आहे.

टॅग्स :कंगना राणौतकसौटी जिंदगी की 2