Join us

सोशल मीडिया स्टार Elvish Yadav ने दुबईत खरेदी केले आलिशान घर; पाहा या घराचा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 14:39 IST

Elvish Yadav Birthday: एल्विश यादवचा आज 26वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याने त्याच्या दुबईतील घराचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Elvish Yadav: सोशल मीडिया स्टार आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव सध्या चर्चेत आहे. एल्विशची फॅन फॉलोइंग आधी होतीच, पण बिग बॉस जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये खूप वाढ झाली. बिग बॉसनंतर एल्विशचे नशीब पालटले आहे. आता त्याला गाण्यांपासून ते चित्रपटपर्यंत, अनेक ऑफर्स येत आहेत. दरम्यान, आज आपला 26वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एल्विश थेट दुबईला गेला आहे.

एल्विशने त्याचा नवीन व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याचे दुबईतील नवीन आलिशान घर दाखवले. त्याने दुबईत तब्बल 8 कोटी रुपयांना हे घर विकत घेतल्याचे समजते. त्याच्या व्लॉगमध्ये आलिशान घर दिस आहे. व्लॉगमध्ये एल्विशने विमानतळ ते दुबई आणि तिथे घालवेल्या आठवणी शेअर केल्या आहेत. 

एल्विशसोबत त्याचे अनेक मित्रही आहेत. ते नेहमी एल्विशच्या व्हिडिओमध्ये दिसत असतात. एल्विसने व्लॉगमध्ये संपूर्ण घर दाखवल्यानंतर, तो आपल्या मित्रांसोबत समुद्राकिनारी फिरायला गेला. सध्या त्याचा हा व्लॉग खूप व्हायरल होत आहे. एल्विशचे चाहते वाढदिवसानिमित्त त्याला खूप शुभेच्छाही देत आहेत. वाढदिवसानिमित्त एल्विशने उर्वशी रौतेलासोबतचे नवे गाणेही रिलीज केले आहे. 

टॅग्स :बिग बॉससोशल मीडियायु ट्यूबसोशल व्हायरलदुबई