Join us
Daily Top 2Weekly Top 5

एजाज खान आणि पवित्रा पुनियाचं झालं ब्रेकअप?, 'बिग बॉस १४'मध्ये सुरु झाली होती दोघांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 13:44 IST

वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसच्या घरात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रेटींच्या ब्रेकअपच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत.असीम रियाज-हिमांशी खुराना, माहिरा शर्मा-पारस छाबरा, बंदगी कालका-पुनीश शर्मा यांच्यानंतर आता एजाज खान आणि पुवित्रा पुनिया यांची नावे समोर येत आहेत. आता त्यांचं नातेही तुटण्याच्या मार्गावर असल्याचं बोलल जातंय. 

 बिग बॉस 14 मध्ये दोघेही एकत्र दिसले होते. सुरुवातीच्या काळात दोघांमध्ये खूप भांडण झाली होती, मात्र त्यानंतर दोघांमध्ये घरातच प्रेम फुललं. वर्षानुवर्षे डेटिंग केल्यानंतर आता या जोडप्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची बातमी आहे.

टाईम्स नाऊच्यानुसार, पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांची लव्हस्टोरी the end होणार आहे. दोघांमध्ये काही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. ते एकत्र राहत असले तरी. मात्र तरीही त्यांच्यात तणाव आहे. दोघेही आपलं नातं वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या कपलनं याला दुजोरा दिलेला नाही. 

एजाज आणि पवित्रा गेल्या ३ वर्षांपासून एकत्र राहत आहेत. एजाजने अनेक मुलाखतींमध्ये अभिनेत्रीचे कौतुकही केले आहे. एवढेच नाही तर 11 डिसेंबरच्या रात्री एका अवॉर्ड फंक्शनमध्येही दोघे एकत्र दिसले होते. एजाज पवित्रापेक्षा 11 वर्षांनी मोठा आहे. 

टॅग्स :बिग बॉस १४टिव्ही कलाकार