Join us

इंडियाज गॉट टॅलेंटचे आठवे पर्वाची दणक्यात सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:08 IST

इंडियाज गॉट टॅलेंटचे आठे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. किरण खेर, मलाईका अरोरा आणि करण जोहर हे या आठव्या पर्वाचे जज आहे.

इंडियाज गॉट टॅलेंटने त्याचा आठवा सीझन धूमधडाक्यात सुरू केल्यानंतर, तो अजूनच मोठा आणि चांगला असणार आहे आणि त्यातील अविश्वसनीय आणि मनमोहक टॅलेंटने प्रेक्षक नक्कीच मंत्रमुग्ध होणार आहेत. या शोमध्ये टॅलेंटचे मिश्रण असणार आहे आणि त्यातील काही विलक्षण अॅक्ट तुम्हाला चकित करणार आहेत तर काही तुम्हाला अखंड हसवून तुमचे तोंड दुखविणार आहेत. इंडियाचे इंटरनेट सेन्सेशन, दीपक कलाल यांचा अॅक्ट असाच सर्वांना हसून हसून लोटपोट करणारा होता.

सेटवरील सूत्रांनी उघड केले, “इंडियाज गॉट टॅलेंट वर ते एक स्पर्धक म्हणून आले होते आणि त्यांच्याकडे ऐकिवात नसलेले जजिंग करण्याचे कौशल्य आहे.” ते म्हणाले, “मी डोक्यापासून ते पायापर्यंत टॅलेंटने भरलेला आहे आणि जर मला संधी मिळाली तर मीच एकमेव लायक जज्ज आहे हे मी सिध्द करून दाखवू शकतो.” तिन्ही परीक्षकांनी अॅक्टचा मनापासून आनंद घेतला आणि त्यांना अजून मजा घेण्याची इच्छा आहे असे दिसत होते कारण त्यांनी दीपकला परीक्षकांच्या टेबलवर सामील होण्यास सांगीतले. नागपूर हून आलेल्या वरिष्ट डान्सर लक्ष्मी च्या परफॉर्मन्स वर कॉमेंट करण्यात त्यांनी त्यांचे कौशल्य सादर केले. त्यांचे कॉमेंट विनोद आणि गंमतीने भरलेले होत्या, तसेच त्यांनी लारा लप्पा वर तिच्या सोबत डान्स सुध्दा केला, आणि त्या डान्समुळे तिन्ही परीक्षकांनी त्यांच्या खुर्चीत उड्या मारल्या.

 इंडियाज गॉट टॅलेंटचे आठे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. किरण खेर, मलाईका अरोरा आणि करण जोहर हे या आठव्या पर्वाचे जज आहे. तर भारती सिंग आणि हृत्विक धनजानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. 

टॅग्स :मलायका अरोराकरण जोहर