Join us
Daily Top 2Weekly Top 5

ड्रामा ज्युनियर्सच्या मंचावर स्वामींचा साक्षात्कार! अमृता खानविलकर बालकलाकाराच्या थेट पायाच पडली, अभिनेत्रीला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 15:59 IST

ड्रामा ज्युनियर्सने त्यांच्या अभिनयातून स्वामी भक्तीचा महिमा सांगितला आहे. याचा प्रोमो व्हिडिओ झी मराठीच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे.

छोट्या पडद्यावरील 'ड्रामा ज्युनियर्स' हा लोकप्रिय शो आहे. या शोमधून अभिनयाची खुमखुमी असलेल्या बालकलाकारांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली. ड्रामा करत हे ड्रामा ज्युनियर्स प्रेक्षकांबरोबरच परिक्षकांनाही अचंबित करतात. झी मराठीवरील ड्रामा ज्युनियर्स या शोमध्ये अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे परिक्षक आहेत. तर श्रेया बुगडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते. ड्रामा ज्युनियर्सने नेहमीप्रमाणे यंदाही परिक्षकांना त्यांच्या परफॉर्मन्सने आश्चर्यचकित केलं आहे. 

ड्रामा ज्युनियर्सने त्यांच्या अभिनयातून स्वामी भक्तीचा महिमा सांगितला आहे. याचा प्रोमो व्हिडिओ झी मराठीच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत स्वामींच्या साक्षात्काराने भक्त भावुक होत असल्याचं दिसत आहे. पण, केवळ भक्तच नाही तर चिमुकल्यांच्या या परफॉर्मन्सने प्रेक्षक आणि परिक्षकही भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ड्रामा ज्युनियर्सचा हा परफॉर्मन्स बघून अमृता खानविलकर भावुक झाल्याचं दिसत आहे. त्याबरोबरच अभिनेत्रीला अश्रूही अनावर झाले आहेत. स्वामींची भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्याला पाहून अभिनेत्री भारावून गेली आहे. 

या व्हिडिओत "विश्वास हाच श्वास आहे. बाकी सगळं भास आहे. चालायला लाग रस्ता सापडेल. नामस्मरणात प्रचंड शक्ती आहे. शिवहर शंकर, नमामी शंकर", असं स्वामी समर्थांची भूमिका साकारणारा चिमुकला म्हणत आहे. त्याच्या या अभिनयाने अमृताला थक्क झाली आहे. अमृताने त्याचं कौतुक करत थेट मंचावर जाऊन त्याच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतल्याचं दिसत आहे. "तू आज जे मला देऊन गेलास ना...मी तुला आयुष्यभर विसरणार नाही", असं अभिनेत्री म्हणते. ३१ ऑगस्ट रोजी हा भाग चाहत्यांना पाहता येणार आहे. 

टॅग्स :झी मराठीअमृता खानविलकरटिव्ही कलाकार