Join us

काय भाईजानने सुरु केली नवज्योत सिंग सिद्धू यांना ‘द कपिल शर्मा शो’ परत आणण्याची तयारी?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 11:21 IST

दहशतवादास धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा,  अशा मवाळ भाषेत पाकिस्तानची पाठराखण करून माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडले आणि  द कपिल शर्मा  शोमधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

ठळक मुद्दे  सूत्रांचे मानाल तर अर्चना पूरण सिंग यांना केवळ काही एपिसोडसाठी साईन करण्यात आले होते. यानंतर सिद्धू या शोमध्ये परत येणार आहेत.

दहशतवादास धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा,  अशा मवाळ भाषेत पाकिस्तानची पाठराखण करून माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडले आणि  द कपिल शर्मा  शोमधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्याच्या जागी या शोमध्ये अर्चना पूरण सिंगची वर्णी लागली. पण आता   सिद्धू यांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परत आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. होय, ‘द कपिल शर्मा शो’चा निर्माता सलमान खान यासाठी प्रकरण शांत होण्याची प्रतीक्षा करतोय.पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची भावना असताना या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना, सिद्धू यांनी पाकिस्तानची पाठराखण करणारे वक्तव्य केले होते. काही लोकांच्या कृत्यासाठी संपूर्ण देशाला जबाबदार ठरवले जाऊ शकते का? हा हल्ला भ्याड होता. मी या हल्ल्याची निंदा करतो. पण ज्यांनी हा हल्ला केला त्यांना या कृत्याची शिक्षा मिळायला हवी, असे सिद्धू म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून रान माजले होते. सिद्धूंना ‘द कपिल शर्मा शो’मधून हटवा अन्यथा आम्ही शो बंद पाडू, अशी भूमिका प्रेक्षकांनी घेतली होती. यानंतर चॅनल सिद्धूंना काढावे की नाही, या संभ्रमात असताना खुद्द सलमानने सिद्धूंना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. निर्माता या नात्याने या प्रकरणात कुठलीही जोखीम पत्करायला सलमान तयार नव्हता. कारण ‘द कपिल शर्मा शो’चा टीआरपी नंबर एक वर पोहोचला होता.  सूत्रांचे मानाल तर अर्चना पूरण सिंग यांना केवळ काही एपिसोडसाठी साईन करण्यात आले होते. यानंतर सिद्धू या शोमध्ये परत येणार आहेत.

टॅग्स :सलमान खाननवज्योतसिंग सिद्धूकपिल शर्मा