Join us

सुर्यास्त पाहणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'चंद्रविलास' मालिकेत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 15:58 IST

Marathi actress: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक अभिनेत्री घराच्या बाल्कनीत बसली आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडिया प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे अनेक कलाकार याच माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बऱ्याचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या जीवनातील लहानमोठे अपडेट्, काही किस्से, प्रसंगी चाहत्यांसोबत शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती पाठमोरी बसली असून ही अभिनेत्री नेमकी कोण असेल असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक अभिनेत्री घराच्या बाल्कनीत बसली आहे. सोबतच ती सुर्यास्त पाहत पाठमोरी बसल्यामुळे ती नेमकी कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे ही नेमकी कोणती अभिनेत्री आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कमालीची वाढली आहे.

फोटोमध्ये पाठमोरी बसलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून भक्ती  देसाई आहे. अलिकडेच ती चंद्रविलास या मालिकेत झळकली होती. भक्ती मालिकांपेक्षा नाटकांमध्ये जास्त रमते. आतापर्यंत तिने तू म्हणशील तसं, नटसम्राट, डोन्ट वरी be happy यांसारख्या नाटकांमध्ये काम केलं आहे. तर, स्वराज्यजननी जिजामाता, अंजली या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीनाटक