Join us

फोटोतील या चिमुरड्यांना ओळखलंत का?, दोघेही आहेत मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 18:04 IST

काही कलाकारांनी रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत तर काहींनी त्यांच्या भावंडांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. असेच मराठी कलाविश्वात असे बरेच भावंड कार्यरत आहेत.

देशभरात नुकताच रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला आहे. काही कलाकारांनी रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत तर काहींनी त्यांच्या भावंडांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. असेच मराठी कलाविश्वात असे बरेच भावंड कार्यरत आहेत. अशीच एक भावाबहिणीची जोडी मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहे ती म्हणजे अभिषेक आणि अमृता देशमुख. या फोटोत दिसत असलेले चिमुकले म्हणजे अभिषेक आणि अमृता. 

अभिषेक आणि अमृता यांचं नातं खूप स्पेशल असल्याचं अनेक पोस्टमधून कळू शकतं. दोघेही एकमेकांबद्दल अनेकदा भन्नाट गोष्टी शेअर करताना दिसतात. या बहीण भावाच्या जोडीने काही भन्नाट रील्स सुद्धा केले आहेत. अमृताने नुकतेच सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीचा फोटो शेअर करत लिहिले की, जर “असुरी आनंद”चा चेहरा असेल तर तो अभिषेक देशमुखसारखा दिसेल!

अभिषेक देशमुख सध्या आई कुठे काय करते मालिकेत यशच्या भूमिकेत दिसतो आहे. तर अमृता बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहचली आहे. अमृताला सगळ्या प्रेक्षकांनी फ्रेशर्स मालिकेत पाहिलं आहे. या मालिकेतील पात्राने तिला घराघरात ओळख दिली. सध्या ही अभिनेत्री एक RJ असून भल्याभल्यांची बोलती ती बंद करताना दिसून येते. पुण्याची टॉकरवडी या नावाने ती सध्या रेडिओ जॉकीचं काम करत असून त्यात सुद्धा ती एकदम तरबेज झाल्याचं दिसून येत आहे. याशिवाय ही अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावरील रील्समुळे सुद्धा ओळखली जाते. अभिषेक आणि अमृता दोघेही पुण्याचे आहेत आणि सध्या त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होताना दिसत आहेत. अभिषेक देशमुखची पत्नी सुद्धा अभिनेत्री असून तिचं नाव कृतिका देव आहे.

टॅग्स :अमृता धोंगडेआई कुठे काय करते मालिकाबिग बॉस मराठी