Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओळखलंत का या चिमुकल्यांना? मनोरंजन विश्वातील दोघेही आहेत आज लोकप्रिय चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 14:15 IST

ज या मुलाने केवळ टीव्हीच नाही तर बॉलिवूडपासून ओटीटीपर्यंत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

बॉलिवूड असो किंवा टीव्ही, प्रत्येक स्टारचे एक मोठं फॅन फॉलोइंग आहे. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सची प्रत्येक छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अनेकदा सोशल मीडियावर स्टार्सचे न पाहिलेले फोटोही खूप व्हायरल होतात, जे पाहून काही वेळा चाहत्यांनाही त्यांना ओळखता येत नाहीत. अलीकडेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला एका प्रसिद्ध सेलिब्रिटीचे बालपणीचे फोटो व्हायरल होतो, जे पाहून तुम्ही त्याला ओळखू शकत नाही.

फोटोत दिसणारा हा क्युट मुलगा आज मनोरंजनाच्या जगात खूप लोकप्रिय आहे. आज या मुलाने केवळ टीव्हीच नाही तर बॉलिवूडपासून ओटीटीपर्यंत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. कॉमेडीच्या जगातील देखील हा बादशाह आहे. जर तुम्ही हा मुलगा कोण हे अजूनही ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला आमखी एक हिंट देतो.  फोटोत दिसणाऱ्या या मुलाने अभिषेक बच्चन ते अजय देवगण आणि अक्षय कुमार यांसारख्या स्टार्ससोबतही दिसले आहे.

फोटोत दिसणारा हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूड सुपरस्टार गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek)आहे. कृष्णाने 'क्या कूल हैं हम 3', 'बोल बच्चन', 'तेरी भाभी है पगले', 'एंटरटेनमेंट' आणि '2 चेहरे' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने 'द कपिल शर्मा शो', 'कॉमेडी सर्कस', 'कॉमेडी नाइट्स बचाओ', 'कॉमेडी नाइट्स लाइव्ह', 'ये मेरा इंडिया' आणि 'द ड्रामा कंपनी' सारख्या शोमध्ये काम केले आहे. तो 'बू सबकी फतेगी' या ओटीटी मालिकेतही दिसला आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार