Join us

'लग्नाची बेडी'फेम सायलीच्या नवऱ्याचं निकनेम माहितीये? बाबू-सोनापेक्षा भन्नाट आहे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 20:00 IST

Sayali deodhar: सायलीने संगीतकार आणि गायक गौरव बुरसे याच्यासोबत लग्न केलं आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात स्पेशल व्यक्ती ही असतेच. कोणासाठी आई-वडील खास असतात. तर, कोणासाठी मित्र-मैत्रिणी, बॉयफ्रेंड वा गर्लफ्रेंड. त्यामुळे आपल्या या खास माणसांना आपण काही ठराविक नावानेही हाक मारत असतो. यात सेलिब्रिटीदेखील मागे नाहीत. सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीदेखील त्यांच्या जीवनातील खास व्यक्तींना निकनेम देत असतात. सध्या सोशल मीडियावर 'लग्नाची बेडी'फेम अभिनेत्री सायली देवधरची चर्चा रंगली आहे. सायली तिच्या नवऱ्याला एका खास नावाने हाक मारते.

अलिकडेच अभिनेत्री सायली देवधरने लोकमत फिल्मीच्या Awkward Rapid Fire या सेगमेंटमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी तिला विचारणाऱ्यात आलेल्या प्रश्नांची तिने उत्तरं दिलं. मात्र, यात तिने दिलेल्या एका उत्तराकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. सिंधू म्हणजेच सायली तिच्या नवऱ्याला कोणतं नावाने हाक मारते हे तिने सांगितलं आहे.

बऱ्याचदा जोडीदार एकमेकांना प्रेमाने टोपणनावाने हाक मारत असतात. तसंच सायलीदेखील तिच्या नवऱ्याला प्रेमाने एका विशिष्ट नावाने बोलावते. सायली तिच्या नवऱ्याला 'बबडू' असं प्रेमाने म्हणते.

दरम्यान, सायलीने संगीतकार आणि गायक गौरव बुरसे याच्यासोबत लग्न केलं आहे. सायली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती लग्नाची बेडी या मालिकेत सिंधू ही भूमिका साकारत आहे. तसंच तिने 'लेक माझी लाडकी', 'जुळून येती रेशीमगाठी' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे उत्तम अभिनयाच्या जोरावर सायली अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. 

टॅग्स :सायली देवधरटेलिव्हिजनसेलिब्रिटी