Join us

तोंडाला मास्क बांधलेल्या अभिनेत्रीला ओळखलंत का? चक्क कर्जतच्या शुक्रवारच्या बाजारात गेली होती भाजी खरेदीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 11:54 IST

Marathi Actress : सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीची चर्चा होताना दिसते आहे.

सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीची चर्चा होताना दिसते आहे. कारण ही अभिनेत्री तोंडाला मास्क लावून कर्जतच्या शुक्रवारच्या बाजारात भाजी खरेदीला गेली आहे. इतकेच नाही तर तिने स्वतःचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून जुई गडकरी आहे. अभिनेत्री कर्जतला राहते. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत पाहायला मिळते आहे.

जुई गडकरी हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, जे लोक मला ओळखतात त्यांना माहित आहे की मला भाज्यांची खरेदी करायला किती आवडते. मी ताज्या भाज्या घेण्यासाठी कुठेही जाऊ शकते. सकाळी लवकर उठून गाडीवरून शुक्रवारच्या बाजारात जायचे आणि शेतातील ताज्या भाज्या विकत घेऊन यायच्या. पाहा हा रिल आणि कर्जतच्या शुक्रवारच्या बाजाराचा आनंद घ्या.

जुई गडकरीने पुढचं पाऊल या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केले. या मालिकेत तिने कल्याणी हे पात्र साकारलं होतं. या पात्रामुळेच तिला घराघरात ओळख मिळाली. पुढचं पाऊलनंतर ती ‘सरस्वती’, ‘वर्तुळ’, ‘बिग बॉस मराठी’ आणि आता ‘ठरलं तर मग’ या मालिकेत पाहायला मिळते आहे. या मालिकेत जुई मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत तिने सायलीची भूमिका साकारली आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :जुई गडकरीस्टार प्रवाह