Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा काय वेडेपणा? ‘दीया और बाती हम’च्या ‘संध्या बींदणी’चा डान्स पाहून नेटकर्‍यांची सटकली   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 13:35 IST

Video : याआधी तौत्के वादळाच्या तडाख्यात उन्मळून पडलेल्या झाडांसमोर डान्स व फोटोशूट केल्याने दीपिका सिंह चांगलीच ट्रोल झाली होती.

ठळक मुद्देलग्नानंतर दीपिकाने टीव्हीपासून थोडा ब्रेक घेतला असला तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय आहे.

‘दीया और बाती हम’  (Diya Aur Baati Hum) या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘संध्या बींदणी’ अर्थात अभिनेत्री दीपिका सिंह (Deepika Singh) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहेत. होय, गेल्या काही दिवसांपासून दीपिका एक ना अनेक कारणांनी सोशल मीडियावर ट्रोल होतेय.याआधी मुंबईत तौत्के वादळाच्या तडाख्यात उन्मळून पडलेल्या झाडांसमोर डान्स व फोटोशूट केल्याने दीपिका सिंह चांगलीच ट्रोल झाली होती.  आता दीपिकाचा एक डान्स व्हिडीओ पाहून नेटकर्‍यांची सटकली आहे. होय, इन्स्टाग्रामवर दीपिकाने डान्स व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती अमेरिकन रॅपर कार्डी बीच्या ‘अप’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. दीपिकाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला आणि यानंतर युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरू केले.

‘मी तुझ्या अ‍ॅक्टिंगचा फॅन आहे. पण डान्सचा अजिबात नाही,’ असे एका युजरने तिच्या या डान्स व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले. तर एकाने ‘भयानक डान्सर’ म्हणून तिची खिल्ली उडवली. आहे.  हा काय वेडेपणा, हिला लॉकडाऊनमध्ये वेडं लागलंय, अशा कमेंट्स करत अनेकांनी दीपिकाला ट्रोल केले.

‘दिया और बाती हम’ ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली.अल्पावधीतच दिया और बाती हम या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती. रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली होती. राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणा-या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवलं होतं.त्यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली होती. लग्नानंतर दीपिकाने टीव्हीपासून थोडा ब्रेक घेतला असला तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

टॅग्स :टेलिव्हिजन