कलाविश्वातून एक गुडन्यूज येत आहे. टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आईबाबा होणार आहेत. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया गुडन्यूज देण्याच्या तयारीत आहेत. दिव्यांका आणि विवेक लग्नानंतर १० वर्षांनी आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दिव्यांका गरोदर असून लवकरच तिचा बेबी शॉवरचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळत आहे.
ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया लवकरच आईबाबा होणार आहेत. ते दोघेही आनंदी असून दोघांच्याही घरात चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनासाठी जय्यत तयारी होत असल्याचं दिसत आहे. दिव्यांका किंवा विवेकने अद्याप याबाबत कोणतीही माहिती ऑफिशियल केलेली नाही. दिव्यांका सध्या ४१ वर्षांची असून पहिल्या बाळाला जन्म देण्यासाठी ती उत्सुक आहे. याआधीही अनेकदा दिव्यांका गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा अभिनेत्रीने या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
दिव्यांका आणि विवेक यांनी २०१६ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. दिव्यांकाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ये है मोहोब्बते' मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. 'बनू मे तेरी दुल्हन', 'क्राइम पेट्रोल', 'अदृश्यम', 'मिस्टर अँड मिसेस शर्मा', 'तेरे शहर में', कसम से या मालिकांमध्ये ती दिसली होती. तर विवेकने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'ये है मोहोब्बते' मालिकेत त्या दोघांनी स्क्रीन शेअर केली होती.
Web Summary : Popular TV couple Divyanka Tripathi and Vivek Dahiya are reportedly expecting their first child after 10 years of marriage. The 41-year-old actress is said to be excited about becoming a mother, although the couple hasn't officially confirmed the news.
Web Summary : खबर है कि लोकप्रिय टीवी कपल दिव्यांका त्रिपाठी और विवेक दहिया शादी के 10 साल बाद अपने पहले बच्चे की उम्मीद कर रहे हैं। बताया जा रहा है कि 41 वर्षीय अभिनेत्री मां बनने को लेकर उत्साहित हैं, हालांकि कपल ने अभी तक इस खबर की पुष्टि नहीं की है।